सावेडी परिसरात बंद बंगल्याचे कुलूप तोडून २१ लाखांची घरफोडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी बंगल्यात प्रवेश केला. कपाटातील चांदीचे व डायमंडच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे २१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सावेडी परिसरातील वसंत विहार पोलिस कॉलनी शेजारील निरंजन कॉलनी येथे घडली आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सावेडी येथील व्यावसायिक दिलीप राघवेंद्र बोरा रा.निरंजन कॉलनी हे काही कामानिमित्त सहकुटुंब शनिवार दि.२१ रोजी बाहेरगावी गेले होते.त्यांच्या बंद बंगल्याचे कूलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला.

आतील सामानाची उचकापाचक करून घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केले.बेडरूमधील कपाटाचे दार तोडून कपाटातील लॉकरचे कुलूप तोडले आणि आतील २१ लाख २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे आणि डायमंडचे दागिने लंपास केले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
याबाबत दिलीप बोरा हे मंगळवारी परत आल्यानंतर दरवाज्याचे कुलूप तोडून घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिली.तोफखाना पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत.त्यांनी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.