२५ वर्षे गप्प बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था केली दयनीय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सभामंडप देवुन व दहावे करून तालुक्याचा विकास करता येत नाही. तालुक्यातील जनतेच्या पिण्याचे व शेतीचे पाणी, शिक्षण, आरोग्य व रस्ते यांचा विकास करणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते. विधानभवनात गेली २५ वर्षे मुग गिळून गप्प बसणाऱ्या लोक प्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था दयनीय केली आहे, असा घणाघाती आरोप माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केला आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेअरमन प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, राहुरी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, सुरेश बाफना, राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष पापाभाई बिवाल, विलास गागरे, प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख, कारखान्याचे संचालक सुरेश बाफना, सुनीलभाऊ आडसुरे, नितीन बाफना, शिवाजी डौले , प.स.सदस्य बाळासाहेब लटके, धोंडिभाऊ सोनावणे, जनरल मॅनेजर सुखदेव शेटे आदिंसह तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.विधानसभेत भांडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लावले पाहिजे
माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले, लोक प्रतिनिधींचे काम म्हणजे तालुक्यातील जनतेचे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, शिक्षण, आरोग्य व रस्ते यांचा विकास करणे. स्थानिक पातळीवर सदरची कामे होत नसतील तर विधानसभेत भांडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लावले पाहिजेत.माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मी विधानसभेत भांडून जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. मी सध्या आमदार नसलो तरी तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न करत आहे.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. 
प्रसाद शुगरचे चेअरमन तथा नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले की तालुक्यातील शेतकरी कारखान्यांवर जो विश्वास ठेवत आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. नगर जिल्ह्यातील प्रगत साखर कारखाना ऊसाला जो भाव देईल, त्यांच्या बरोबरीनेच प्रसाद शुगर भाव देईल. कोणत्याही बाबतीत प्रसाद शुगर कारखाना मागे पडणार नाही. कारखान्याने ६.५० लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस प्रसाद शुगरला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी केले. .

आमचा विरोध चुकीच्या प्रवृत्तीला. 
अमोल वाघ म्हणाले, आम्ही दुष्काळी भागातील आहोत पण स्वाभिमानी आहोत. आमचा कोणालाही विरोध नसून चुकच्या प्रवृत्तीला विरोध आहे. विद्यमान आमदारांनी किमान एखादी तरी संस्था उभी करून एक तरी चूल पेटवली आहे का ? प्राजक्त तनपुरे यांनी प्रसाद शुगर उभा करून किमान ४०० कुटुंबांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडविला आहे. त्याचप्रमाने शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या वेळी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मदतीला प्राजक्त तनपुरेंशिवाय कोणीही पुढे आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.