सरकारचे आश्वासन फोल,शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही नाही जमा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील जवळपास ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजतागायत कर्जमाफीची दमडीदेखील जमा झालेली नाही. त्यामुळे सरकार आपली फसवणूक करीत आहे की काय, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागली आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कर्जमाफीच्या प्रश्नावरून सत्तेतील साथीदार शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी केल्यानंतर राज्यातील सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. कर्जमाफीला 'छत्रपती महाराज शेतकरी सन्मान योजना' असे भारदस्त नाव दिले.

पहिल्या टप्प्यात आठ लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. १८ ऑक्टोबरला सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात खास सोहळा आयोजित करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्या-जिल्ह्यात अशी प्रमाणपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. त्याला आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक रुपयादेखील जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कर्जमाफीचे ढोल बडवले जात आहेत. त्यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने मुख्यमंत्र्यांची खास जाहिरात तयार केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे गुणगान गाणारी आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ही जाहिरात गेले काही दिवस विविध चॅनल्सवर झळकत आहे.

त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सरकारकडून कर्जमाफीचे श्रेय घेणारी जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार अद्याप एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या रकमेपैकी एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे सरकारचे कर्जमाफीचे आश्वासन फोल ठरल्याची शेतकऱ्यांची भावना झाली असल्याने नाराजी पसरली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.