कोपर्डी अत्याचार प्रकरण अंतिम युक्तीवादाला प्रारंभ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यात सर्वत्र गाजलेल्या बहुचर्चीत कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार व खून खटल्यातील अंतीम युक्तीवादाला गुरुवारी (दि.२६) जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्यासमोर प्रारंभ झाला. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांनी कोपर्डी अत्याचार व खुनाच्या घटनेचा घटनाक्रम आज न्यायालयासमोर मांडला. विशेष म्हणजे या खटल्याच्या अंतीम युक्तीवादाचे न्यायालयात ऑडिओ रेकॉडिंग करण्यात आले. याचे ॲड.निकम यांनी स्वागत केले. परदेशात अशा प्रकारची सोय उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी न्यायालयात सांगितले. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि. २७) सुरु राहणार आहे.

न्यायालयात युक्तीवाद करताना ॲड. निकम यांनी कोपर्डी घटनेतील अत्याचारीत मुलीच्या अंगावर असलेल्या २८ जखमा, तसेच तिच्या अंगाला चावे घेतल्याच्या बाबी पोलिस पंचनाम्यात आलेल्या असल्याचे सांगून. वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार, कुळधरण, मुंबई येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे आणि पीडितेच्या शाळेतील गैरहजेरी बाबत वर्गशिक्षक बाबा धायगुडे. यांनी घेतलेल्या नोंदी न्यायालयाच्या निर्देशनास आणून देताना, परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरण्याबाबतचे विविध न्याय निवाड्यांचे दाखले यावेळी दिले. 


गुरुवारी (दि. २६) न्यायालयापुढे अंतीम युक्तीवाद करताना ॲड.निकम यांनी एकूण २४ मुद्दे मांडणार असल्याचे सांगून. आज दोन मुद्यावर सविस्तर चर्चा केली. पोलिस पंचनामे व साक्षीदारांचे जबाब याचे विवेचन केले. कोपर्डी खटल्यात एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. 

सुनावणीच्यावेळी.न्यायालयात आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आरोपीचे वकील ॲड.योव्हान मकासरे,ॲड.बाळासाहेब खोपडे,ॲड.प्रकाश आहेर उपस्थित होते.

ॲड.निकम यांनी युक्तीवाद करताना या घटनेतील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी कशा पध्दतीने कट रचला होता. याची सविस्तर माहिती विषद केली. या घटनेत कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृर्णपणे खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी कोपर्डी गावातीलच रहिवाशी असून,घटना घडण्यापूर्वी पीडित मुलीला शाळेतून येताना आरोपींनी रस्त्यामध्ये अडवून मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने दमदाटी करुन तिला रस्त्याच्या कडेला ओढण्याचा प्रयत्न केला होता. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
त्या घटनेच्यावेळी पीडित मुलीची मैत्रीणसुध्दा तिच्या समवेत होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने मुलीला पकडल्यानंतर अन्य दोघांनी हिला आपण नंतर 'कामच दाखवू' असे म्हणाले. त्यावेळचे आरोपींचे वक्तव्य पाहता सदरचा गुन्हा करण्याचा कट रचल्याचे सिध्द होत असल्याने त्यांनी निर्देशनास आणून देताना. आरोपींनी कट कोठे शिजला याची कल्पना येत नसली तरी परिस्थितीजन्य पुरावा विचारात घ्यावाच लागेल असे स्पष्ट केले. 

यावेळी त्यांनी या घटनेचा घटनाक्रम विशद करताना, या छेडछाडीच्या घटनेनंतर पीडित मुलगी दोन दिवस शाळेत गेली नव्हती. तसे तिच्या वर्ग शिक्षकांनी गैरहजेरी घेतल्याचे त्यांच्या जबाबावरुन स्पष्ट होते. पीडित मुलगी घाबरल्यानेच शाळेत गेली नाही याची सुध्दा जबाबात नोंद घेण्यात आली आहे. 

तसे शाळेचे हजेरी पत्रकाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. पीडित मुलगी घाबरल्याने या घटनेची माहिती तिच्या मोठ्या बहिणीला दिल्यानेच तीने धीर दिला. त्यानंतर ती स्वत: आजोबांकडे मसाला आणण्यासाठी जात असताना पीडितेची बहिण सोबत येते असे म्हणाली असता. ती मी जाते, असे सांगुन तिची भीती कमी झाल्याचे लक्षात येते. वर्गशिक्षकाप्रमाणेच तिच्या मैत्रीणीचे सुध्दा जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले आहेत. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
उलट तपासणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेले प्रश्न, मुद्याला धरुन नसल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब त्यांनी विविध प्रकारचे उदाहरणे देवून लक्षात आणून दिली. घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणेने तात्काळ तपास करुन जी कागदपत्र पाहिजे होती ती उपलब्ध करुन घेतली आहेत. सरकारी पक्षाने जे पुरावे दाखल केले, ते न्यायालयासमोर पुराव्यानिशी दाखल केल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले.

पीडितेची सायकल तिच्या कुटुंबीयांनी ओळखली असून, सायकल बाबत आरोपींकडून केलेला बचाव ॲड.निकम यांनी खोडून काढला. आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे हा अत्याचार व खून करुन पळून जात असताना त्याला पाहिल्याचे सांगून. त्याची चप्पल व गळ्यातील चैन घटनास्थळापासून काही अंतरावर सापडली होती. त्यामुळे आरोपी शिंदे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचा शास्त्रीय आधार मिळतो, असे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले. 

पंचागानुसार घटना घडलेल्या दिवशीचा सुर्यास्त आणि सांजवेळ व प्रकाश याची पुरेशी कल्पना येते. याबाबत आरोपीला पळून जाताना पाहिल्याचे सांगताना कसे दिसून येते यासह अनेक गोष्टीचा न्यायालयासमोर खुलासा केला. पीडित मुलीच्या अंगावर चावे घेतल्याचे ठसे दंतरोगतज्ज्ञ डॉ.हेमलता पांडे यांनी घेतले होते. ते आरोपी पप्पू शिंदे यांच्या दातांच्या ठशाशी साम्य असल्याचे तपासात पुढे आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले.

बहुचर्चित कोपडी खटल्याची अंतीम युक्तीवादाची ऑडिओ रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सुरु असून. ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगतांना त्यांनी परदेशात अशी व्यवस्था असल्याचे स्पष्ट करुन याचे स्वागत केले. या खटल्यातील युक्तीवाद सरकार पक्षाने पाच महिन्यात पूर्ण केलेला असून, आरोपींच्या वकिलांकडून खटला लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे या सुनावणीला उशिर झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कोपर्डी खटल्याचा निकाल ठराविक कालावधीत लागला पाहिजे. तसेच निकालाच्या तारखा काही लोक परस्पर जाहीर करत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त करुन या अतिसंवेदनशील घटनेबाबत जबाबदारीने व्यक्तव्य होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.