मैदानी खेळामुळे काम करण्याची स्फूर्ती मिळते - नरेंद्र फीरोदिया

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दैनंदिन कामाच्या ताणतणावातून मोकळीक मिळावी यासाठी मैदानी खेळ हा अत्यंत सोपा व सहज मार्ग आहे. जैन ओसवाल युवक संघाने गेल्या दोन वर्षांपासून जैन समाजातील युवकांकरीता ओसवाल प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन चांगला उपक्रम हाती घेतला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मैदानी खेळामुळे ताणतणाव कमी होत असल्याने नव्याने काम करण्याची स्फुर्ती मिळते. या चांगल्या उपक्रमांना कायम सहकार्य करु, असे प्रतिपादन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फीरोदिया यांनी केले.ओसवाल पंचायत सभा व जैन ओसवाल युवक संघाच्या संयुक्त विद्यमाने नगर क्लबच्या लॉनवर आयोजित ओसवाल प्रिमियम लिग या क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र फीरोदिया यांच्या हस्ते झाले. 

--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

याप्रसंगी अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शैलेश मुनोत, राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे, जैन ओसवाल पतसंस्थेचे संचालक संतोष गांधी, जैन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष राजेश बोरा, प्रोजेक्ट चेअरमन समीर बोरा आदिंसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.