पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा बंगल्यावर 18 लाखांची थकबाकी.

दैनिक दिव्य मराठी :नगर-शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलिस प्रशासनाने महापालिकेचा लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानाची १८ लाख ५४ हजार रुपयांची पाणीपट्टी घरपट्टी गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दरम्यान, महापालिकेनेदेखील पोलिस प्रशासनाचे बंदोबस्ताचे एक कोटी २९ लाख रुपये थकवले आहेत. महापालिका पोलिस प्रशासन एकमेकांकडील थकबाकीच्या रकमांचे समायोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही.

सर्वसामान्य नागरिकांची किरकोळ थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी थेट दारापर्यंत येतात. परंतु शहरातील सरकारी कार्यालयांकडे असलेली कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नाही. 

नगर-औरंगाबाद महामार्गावरील महापालिकेच्या कार्यालयाजवळ असलेल्या पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानाचा लाखो रुपयांचा मालमत्ता काही वर्षांपासून थकला आहे. ही थकबाकी जुनी असली, तरी ती भरण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. 

गंगा उद्यानाजवळील पोलिस विश्रामगृह, गुलमोहर पोलिस चौकी, पत्रकार चौकातील वाहतूक शाखा, तसेच कोतवाली तालुका पोलिस ठाण्याचा देखील लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. महापालिकेची पोलिस प्रशासनाकडे ६० ते ७० लाख रुपयांची थकबाकी अाहे, तर पोलिस प्रशासनाचे देखील महापालिकेकडे एक कोटी २९ लाख रुपये थकीत आहेत. 

अतिक्रमण, मोर्चे, आंदोलने, तसेच सभांसाठी पोलिस प्रशासनाने महापालिकेला वेळोवेळी बंदोबस्त पुरवला आहे. मात्र, या बंदोबस्तासाठी भरावे लागणारे शुल्क महापालिकेने अद्याप पोलिसांना दिलेले नाही. त्यामुळे महापालिका पोलिस प्रशासन थकबाकीसाठी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. 

थकीत मालमत्ता कर, भरावा, यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पोलिस प्रशासनाने देखील बंदोबस्ताची थकीत रक्कम मिळावी, यासाठी तगादा लावला. परंतु दोघांकडील थकबाकीचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. 

महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराची रक्कम बंदोबस्ताच्या रकमेतून समायोजित करावी, यासाठी पोलिस प्रशासनाचा राज्याच्या गृह विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु त्याबाबत अद्याप काेणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे कार्यवाही लांबली आहे.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

समायोजनासाठी पत्रव्यवहार
महापालिकेची जी थकबाकी आहे, ती जुनीच आहे. चालू मालमत्ता कर नियमित भरत आहोत. जुनी थकबाकीची रक्कम बंदोबस्ताच्या रकमेतून समायोजित करून घ्यावी, यासाठी गृह विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल.
- आनंदभोईटे, पोलिस उपअधीक्षक.

अशी आहे थकबाकी
एसपी बंगला : १८,५४०२०
विश्रामगृह : ३,००९३१
वाहतूक शाखा : २९,८१३४
गुलमोहर चौकी : १४१३०

मार्चपर्यंत थकबाकी वसूल होईल
पोलिस प्रशासनाकडे जी थकबाकी आहे, त्यासाठी त्यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू आहे. जानेवारी किंवा मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम देण्याचे त्यांनी कबूल केले आहे. त्यांची देखील आमच्याकडे बंदोबस्ताची थकबाकी आहे. दोघांकडील थकबाकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.
- राजेंद्र चव्हाण, उपायुक्त, महापालिका.

पुढे काय?
थकबाकीच्या नावाने महापालिकेचे नेहमीच रडगाणे सुरू असते. पोलिस प्रशासनाकडे असलेल्या लाखो रुपयांच्या थकबाकीबाबतही हे रडगाणे सुरू आहे. प्रत्यक्षात वसुलीच्या नावाने मात्र बोंब आहे. या थकबाकीबाबत तोडगा निघाला नाही, तर थकबाकीचे आकडे असेच वाढत राहतील. महापालिका प्रत्येक मालमत्तेच्या थकबाकीवर दोन टक्के (शास्ती) व्याज आकारते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.