साथीच्या आजाराचे नागरदेवळेत थैमान, गावात डेंग्यूचा तीसरा बळी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरासह लगतच्या परिसरात काही महिन्यापासून साथीचे आजार पसरत असताना, नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातला आहे. नुकताच डेंग्यूने गावात तीसरा बळी गेला असून, संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या प्रश्‍नी उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन नगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रेशमा होजगे यांना देण्यात आले. या मागणीची दखल न घेतल्यास गावातील घनकचरा ग्रामपंचायत कार्यालया समोर टाकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे, भागचंद तागडकर, दत्तात्रय फुलारी, सनी पाटोळे, समीर पठाण आदि उपस्थित होते.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

नागरदेवळे परिसरात 21 हजार 542 लोकसंख्या वास्तव्यास आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाण व साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डेंग्यूसह इतर साथीचे आजार गावात पसरत असून, नुकताच डेंग्यू या आजाराने गावातील अकरा वर्षीय भीमा प्रकाश अल्हाट हा मुलगा दगावला. 

तसेच गावामधील बहुतांश कुटुंबातील व्यक्ती आजाराने त्रस्त असून, खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. साथीच्या आजाराने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रश्‍नी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी स्वत:हून लक्ष घालून गावात साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावून, परिसरात औषध फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.