सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे दि.२४ रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. मनीषा अप्पा झेंडे (वय३२) असे मयत महिलेचे नाव आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ गणेश अशोक मोरे, रा. कौठा, ता. श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पो.ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत महिलेच्या पती अप्पा शिवराम झेंडे, रा. शेडगाव, नणंद कविता देविदास शिंदे, रा.शिंदा,ता. कर्जत, संगीता दाळिंबे, रा. शिरापूर, ता. दौंड, जि. पुणे या तिघांविरोधात श्रीगोंदा पो. ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती अशी की, मनीषा अप्पा झेंडे यांचा पाच वर्षांपूर्वी शेडगाव येथील अप्पा झेंडे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर मनीषाचा पती अप्पा झेंडे यास दारूचे व्यसन लागले. तो पत्नी मनीषाला मारहाण करून त्रास द्यायचा तसेच माहेराहून पैसे आणण्यास सांगत असे. तसेच मनीषाच्या दोन नणंदा देखील माहेरी शेडगावला आल्यावर मनीषाला त्रास देऊन मारहाण करीत होत्या. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास शेडगाव येथील विहिरीत मनीषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत शेडगावच्या पोलीस पाटलांनी मनीषाच्या माहेरच्या लोकांना माहिती दिली. मनीषाच्या मृत्युमुळे माहेरचे लोक संतप्त झाले. 

मनीषाच्या पतीला आमच्यासमोर आणल्याशिवाय मृतदेह बाहेर काढू देणार नाही, अशी भूमिका माहेरच्या लोकांनी घेतल्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. सहाय्यक पो. निरीक्षक निलेश कांबळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन देऊन जमावाला शांत केले. 

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पती व दोन नणंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अप्पा शिवराम झेंडे याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पो.निरीक्षक निलेश कांबळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.