आ. कर्डिलेंच्या फराळ कार्यक्रमाची जिल्ह्यातील राजकारण्यांना भुरळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी, नगर, राहुरी मतदारसंघाचे आ. शिवाजीराव कर्डिले दरवर्षी दीपावली पाडव्यानिमित्ताने बुऱ्हाणनगर येथे आपल्या घरी आपल्या कार्यकर्त्यांसाठी व हितचिंतकांसाठी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करतात. गेली पंचवीस वषांर्पासून हा उपक्रम आ. कर्डिले राबवत असले तरी या फराळ कार्यक्रमाची आता इतरही अनेक राजकारण्यांना भुरळ पडल्याचे दिसते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी आता फराळ कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या जवळच्यांना फराळसाठी आमंत्रित करू लागले आहेत. सन १९९५ साली आ. कर्डिले नगर नेवाशामधून प्रथम आमदार झाले. तेव्हापासून त्यांनी सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू माणून त्याच्याशी आपली नाळ ज़ुळवून ठेवण्याचे काम केले. लग्न, दशक्रिया , हरिनाम सप्ताह, साखरपुडा, जागरणगोंधळासह सर्वच लहान मोठया सुख दुख:च्या कार्यक्रमाला हजेरी लावून नेता आणि सर्व सामान्य जनतेमधील दरी कमी करण्याचे काम केले. 

वर्षभर आपण विविध विकास कामांच्या अथवा कार्यक्रमाच्या माध्यमातून इतरांच्या घरी जात असतो. तेथे आपला उचित सत्कार व स्वागत होते. त्यामुळे आपणाकडूनही वर्षातून किमान एकदा तरी आपल्या जवळच्यांचा सन्मान, पाहुचार व्हावा, ही भावना मनामध्ये धरून आ. कर्डिले गेल्या पंचवीस वषांर्पासून दीपावली पाडव्याच्यानिमित्ताने आपल्या घरी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावर्षीच्या फराळ कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी नव्याने बांधलेल्या आलिशान बंगल्याची पूजा फराळ कार्यक्रमाच्या दिवशीच ठेवून आपल्या नवीन वास्तूचे दर्शन कार्यकर्त्यांना घडविले. अनेकवेळा नेतेमंडळींचे फ्लॅट, बंगले कोठे आहेत हेदेखील कार्यकर्त्यांना माहीत नसतात. मात्र, आ. कर्डिले हे एक वेगळच मिसाईल असल्याने त्यांनी राबवलेले अनेक फंडे हळूहळू आता इतरही राजकारणी वापरू लागले आहेत. 

यावर्षी पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेक राजकारण्यांनी देखील फराळ कार्यक्रम यशस्वीपणे राबवला आहे. त्यामुळेच आ. कर्डिले यांनी पंचवीस वर्षांपासून हाती घेतलेल्या फराळ कार्यक्रमाची आता अनेकांना भुरळ पडू लागली असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.