मागील भांडणातून राहते घर पेटवून दिले माजी सरपंचासह शिक्षकाविरुद्ध गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागील भांडणाच्या कारणातून राघोहिवरे येथील ज्ञानदेव धोंडीबा कुरे यांच्यासह इतर तीन भावांचे राहते घर पेटवून देण्यात आले. आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून सुमारे ऐंशी हज़ार रुयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे येथे घडली. याबाबत माजी सरपंच व एका शिक्षकासह चार जणांवर घर पेटवून दिल्याबाबतचा गुन्हा पाथर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यामुळे राघोहिवरे येथे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राघोहिवरे येथील ज्ञानदेव धोंडीबा कुरे, पंजाब धोंडीबा कुरे, टिलू धोंडीबा कुरे व संपत ज्ञानदेव कुरे हे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोर कुटुंबीयांसमवेत जेवण करत होते.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
या वेळी मागील भांडणाचा राग मनामध्ये धरत कुरे यांच्या घरासमोर येऊन माजी सरपंच संभाजी कोंडीबा वांढेकर, माध्यमिक शिक्षक विनायक कारभारी वांढेकर, राम सुखदेव वांढेकर, सतीश सुखदेव वांढेकर यांनी कुरे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी काहींनी कुरे यांच्या छपराच्या घराला मागील बाजूने आग लावली. परंतु घरातील सर्व माणसे ज़ागे असल्याने जीवितहानी झाली नाही.

मात्र, घरातील चारही खोल्यांमधील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आगीत सुमारे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद दिलीप वामन कुरे यांनी दिली आहे. घर जळाल्यामुळे कुरे यांचे संपूर्ण कुटुंब उघडयावर आले आहे. 

सोमवार, दि. २३ रोजीच वांढेकर व कुरे यांच्यामध्ये चिचोंडी शिराळच्या आठवडे बाजारामध्ये वाद झाला होता. त्यावेळीदेखील दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. या वादातून मंगळवारी रात्री कुरे यांच्या घराला आग लावण्यात आली. पुढील तपास पोनि. राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राख करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.