तर साईंच्या समाधी शताब्दी वर्षात भीक मांगो आंदोलनातून निधी गोळा करणार...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नाशिकचा कुंभमेळा आणि माहुरच्या विकासासाठी सरकारने करोडो रूपयांचा निधी देऊन तेथील देवस्थानांचा व परिसराचा विकास करणाऱ्या राज्य सरकारने देशातील क्रमांक दोनचे असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला समाधी शताब्दी सोहळ्याला सुरुवात झशली, तरी अद्याप एक छदामही दिला नाही. सरकार व साई संस्थानने करोडो साईभक्तांचा विश्वासघात केला असल्याची टीका शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली आहे..

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर साईबाबांच्या विचारांचा प्रचार होऊन आज जगभरात साईबाबांचे करोडो साईभक्त आहेत. या भाविकांच्या दानातून साईबाबांची झोळी खचाखच भरत आहे. या दानातून साईमंदिर व शिर्डी शहरात साईभक्तांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी यापूर्वीच्या विश्वस्त मंडळाने निर्णय घेतले.

त्यातून शिर्डीचा विकासही झाला; मात्र अलिकडच्या काळात शिर्डीच्या विकासाला विश्वस्त मंडळाने पूर्णपणे ब्रेक लावला आहे. साईंचे समाधी शताब्दी वर्षानिमित्त शिर्डीत जगाच्या कानाकोपऱ्यातून करोडो साईभक्त शिर्डीला येणार असल्याने त्यांच्यासाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार व साई संस्थान फक्त वेळकाढूपणाचे धोरण घेत आहेत. 

समाधी शताब्दीसाठी साडेतीन हजार कोटींचा विकास आराखडा मंजूर होवून वर्ष उलटले, तरी त्यातील एक छदामही सरकारने अथवा साईसंस्थानने खर्च केला नाही. नाशिकच्या सिंहस्तासाठी मोठा निधी दिल्याने नाशिकचा चेहरा मोहरा बदलला. मोठी विकासकामे झाल्याने तेथील पर्यटनाला मोठा लाभ होत आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
शिर्डीच्या नागरीकांची व भाविकांची दिशाभुल 
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या माहुर गडाच्या विकासासाठी सरकारने अडीच हजार कोटीचा निधी मंजुर करून प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली. मात्र जगाला एकात्मतेचा संदेश देणाऱ्या व देशातील क्रमांक दोनच्या असलेल्या शिर्डीच्या विकासासाठी राज्य सरकार शिर्डीच्या नागरीकांची व भाविकांची दिशाभुल करित आहे. 

समाधी शताब्दीसाठी फक्त निधीच्या घोषणा
समाधी शताब्दी सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ झाला तरी शहरात पायाभुत सुविधांना सरकारने सुरवात केली नाही. समाधी शताब्दीसाठी निधीच्या घोषणा झाल्या; परंतू या घोषणांची अंमलबजावणी सरकार कधी करणार आहे? हा प्रश्न आता ग्रामस्थ व साईभक्तांना पडला आहे. मुळात साईंच्या समाधी शताब्दी वर्षात शिर्डीला गर्दीच होऊ नये, हीच भुमीका साईसंस्थान विश्वस्त मंडळाची असल्याचे समोर आले आहे.

डॉ. सुरेश हावरे यांचा फक्त घोषणांचा पाउस.साईबाबा संस्थानवर डॉ. सुरेश हावरे यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळ वर्षभरापूर्वी विराजमान झाल्यावर फक्त घोषणांचा पाउस विश्वस्त मंडळाने पाडला. प्रत्यक्षात काम काहीच नाही. यापूर्वी शहरातील प्रलंबित प्रश्नांसाठी मोर्चे काढणारे, सरकारला जाब विचारणारी मंडळीही गप्प आहेत. यानिमित्ताने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. 

शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत.
शिर्डी शहरात चालायला रस्ते नाहीत. भाविकांसाठी पायाभुत सुविधा नाहीत. संस्थानच्या रूणालये डॉक्टरांअभावी व मशिनरींअभावी ऑक्सीजनवर आहेत. येथील रूग्णालयांवर खर्च करण्यापेक्षा बाहेरच्या रूग्णालयांसाठी निधी दिला जात आहे. कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक असलेल्या शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आली आहे. 

विश्वस्त मंडळ पुर्णपणे नापास. 
भाविकांसाठी मनोरंजनाची कोणतीही सुविधा नाही. गार्डनचा प्रश्नही प्रलंबीत आहे. विश्वस्त मंडळ पुर्णपणे नापास झाले आहे. या विश्वस्त मंडळाने जगातील साईभक्तांचा व शिर्डीकरांचा विश्वासघात केला आहे. 

भीक मॉँगो आंदोलनातून निधी गोळा करणार.
सरकारकडे व संस्थानकडे शिर्डी शहराच्या विकासासाठी निधी नसेल तर आम्ही शिर्डीकर साईंच्या समाधी शताब्दी वर्षात भीक मॉँगो आंदोलन करून निधी गोळा करू व तो साईसंस्थानच्या विश्वस्तांना देवू, असा इशाराही कोते यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.