आजपासून होणार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्‍कम जमा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. एकाच आधार नंबरवर १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची नावे असल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत शेतात सुरू असलेली हातातली कामे टाकून, रांगा लावून हे अर्ज भरून दिले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शेतकरी कर्जमाफीच्या यादीत झालेल्या घोळामुळे शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीत नुकसानभरपाईची रक्‍कम पडली नाही. एकाच व्यक्‍तीच्या नावे दोन वेगवेगळी खाती, अनेकांच्या नावावर एकच आधार क्रमांक आदींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली.

पहिल्‍या टप्प्यातील ग्रीन लिस्‍टमध्ये ज्‍या काही तांत्रिक अडचणी असतील त्‍यावर आयटी व बँक अधिकाऱ्यांनी एकत्र बसून तोडगा काढावा. यादीत बिनचूक माहिती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर गुरुवारपासून रक्‍कम जमा करण्यास सुरुवात करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्यात येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा' निवासस्‍थानी राज्‍यस्‍तरीय बँकर्स समितीची तातडीची बैठक बोलावली होती. सहकार मंत्री सुभाष देशमुखही या वेळी उपस्थित होते. साडेआठ लाख शेतकऱ्यांची पहिली ग्रीन लिस्‍ट तयार करण्यात आली आहे. त्‍यात एकाच व्यक्‍तीच्या नावे दोन वेगवेगळी खाती असल्‍याचे निदर्शनास आले. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
त्‍यातच दिवाळीच्या सलग आलेल्‍या सुट्ट्यांमुळे कर्जमाफीची रक्‍कम जमा होण्यास विलंब झाला. त्‍या अडचणी तातडीने सोडवाव्यात असे आदेश .मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.निकषात बसणारा एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असा दिलासाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

बँकांच्या आयटी विभागाने राज्‍य सरकारच्या आयटी विभागाशी संपर्क साधावा. प्रत्‍येक बँकेने त्‍यांचा एक आयटी तज्ज्ञ राज्‍य सरकारच्या आयटी विभागाकडे समन्वयासाठी नेमावा. ज्‍या बँकांचे मुख्यालय पुणे येथे आहे त्‍यांना आयटी विभागाने आपले मनुष्‍यबळ उपलब्‍ध करून द्यावे. यामुळे त्‍यांना स्‍थानिक पातळीवरच प्रश्न सोडवता येतील. जिल्‍हा मध्यवर्ती बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विभागवार सहा तंत्रज्ञ नेमून मार्ग काढण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्‍या. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.