महानगरपालिकेपेक्षा नगर परिषद असलेले अहमदनगर चांगले नाही का ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वार्ड क्र. १९ मध्ये वारंवार काम निघत असतात मला व मुजाहिद-बा- कुरेशी स्वत:चे पैसे खर्च करुन नागरिकांचे प्रश्न सोडावे लागतात पण आमच्याकडे महापालिका आयुक्त महापौर आयुक्त यांचे लक्ष नाही हे शहराचा विकास नाही तर शहर भकास करण्याचे काम करतात. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आम्हांला या परिसरामध्ये ३ ते ४ दिवस पाणी येत नाही व नागरिकांच्या मुलभूत गरजासुध्दा या भागातील नागरिकांना महानगर पालिका देऊ शकत नाही तर सामान्य जनतेने काय करावे असा प्रश्­न निर्माण झाला असून महानगर पालिकेपेक्षा नगर परिषद असलेले अहमदनगर चांगले नाही का ? महानगर पालिका उद्वस्त झालेली आहे असे प्रतिपादन नगरसेवक नजू पैलवान यांनी केले.

प्रभाग क्र. १९ येथील झेंडीगेट परिसरामध्ये रस्त्याच्या क्रॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक नजू पैलवान यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुजाहिद कुरेशी, रशिद भंगारवाले, मुजफर कुरेशी, हाजीसरवर कुरेशी, अजमद इरानी, मुनाफ कुरेशी, मतीन कुरेशी, मुन्ना सय्यद, अकलाक जागिरदार, जहीर शेख व परिसरातील नागरीक उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप व नगरसेवक निधीमधून आम्ही प्रभागात काम करतो. 

महानगरपालिकामधून आम्हांला एकही काम खथून मिळत नाही. मोठी कामे आमदार निधीतून पाठपुरावा करुन करावा लागतात. आमच्या भागामध्ये सत्ताधारी बजेट मध्ये आमच्या प्रभागातले कोणतेच काम घेत नाही. महापौर हा पुर्ण शहरासाठी असतो, पण त्यांना याचा विसार पडला आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
आयुक्तही शासनाचे असून त्यांचेही आमच्या भागाकडे कधीच लक्ष नसते व आमचे कामही होत नाही. नागरिकांच्या माथे महानगर पालिका सर्व प्रकारचे कर लावून वसुल करतात पण त्याच्या तुलनेत नागरिकांना सुविधा १% ही मिळत नाही. शहरात अनेक भागात रस्ता नसुन फक्त खडे आहेत. गटार ही उघडयावर असून तुंबलेल्या दिसतात. मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट आमच्या परिसरात व शहरातील अनेक भागामध्ये सुरुच आहे.

महापालिका कोणत्याच नागरिक समस्येवर ठेास उपाययोजना करुन कायमचा प्रश्­न सोडविण्यास सक्षम नाही.ठेकेदाराचेही बील थकल्याने प्रभागातील काम कोणी घेत नाही अशी बिकट परिस्थिती महानगर पालिकेची व नगर शहराची झालेली आहे, असे मनोगत मुजाहिद कुरेशी यांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.