नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला गेला असता तर आज तुम्ही नगराध्यक्ष नसता !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सत्ताधारी नगरसेवकांच्याच प्रभागातील विकास कामे सुरू असून विरोधकांनी मागणी करूनही साधा ढापाही मिळत नसल्याने आज मासिक सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार खडांजगी झाली. अधिकाऱ्यांना धारेवर धरतांनाच नगराध्यक्षांना याचा जाब विचारण्यात आला. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांची मौनीबाबाची भूमिका नगरसेवकांचा पारा वाढविणारी ठरली. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अधिकाऱ्यांनी कामे करताना दुजाभाव केल्यास यापुढे पालिकेत काम करू देणार नसल्याचा सज्जड इशारा एका ज्येष्ठ नगरसेवकाने यावेळी दिला. अतिक्रमण काढण्यावरून एका व्यापाऱ्याने नगराध्यक्षांच्या दालनात अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यासह नगरसेवकावर केलेला देवाणघेवाणीचा आरोपामुळे पालिकेची झालेली बदनामी यापुढे थांबविण्याची मागणी दोन्ही गटातील नगरसेवकांनी केली.

कामासाठी तुमच्याबरोबर आलो. तुम्हाला मत दिले नाही. नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला गेला असता तर आज तुम्ही नगराध्यक्ष नसता. काम करणार नसतील, तर तुमच्याबरोबर नाही, असे नगरसेवक शिंदे यांनी स्पष्ट करताना आमच्याकडील निवडणूक वाटती तेवढी सोपी नाही. मात्र, जोपर्यंत जिवंत तोपर्यंत निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एखादा विषय जास्त लांबविण्याऐवजी करू पाहू असे आश्वासन द्यायला शिका. जे कामे होतील, ती करीत जा असा सल्लाही त्यांनी नगराध्यक्षांना दिला.

नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाल आज पालिकेची मासिक सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी सुमंत मोरे, उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते. वारंवार मागणी करूनही प्रभागतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम मिळत नाही, विजेचे पोल, ढापेही मिळत नसल्याचा आरोप नगरसेवक मुक्तार शाह यांनी उपस्थित करत मध्यंतरी मुरुम न टाकताच ठेकेदाराचे दोन लाख रुपयांचे बील मंजूर करण्यात येतात, यावर नगरसेवक मुज्जफर शाह, संजय फंड, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी यांनी खुलासा मागितला. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

गोंधवणी रस्त्यावरून नगरसेवक आक्रमक.
शहरातील बेलापूर, नेवासा, संगमनेरकडे जाणारे रस्ते झाली आहेत. मात्र, गोंधवणीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे नेहमीच दुजाभाव केला जातो. या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या चार टर्म होवूनही हा रस्ता दुर्लक्षित आहे. नगरपालिका फंडातून अथवा कोणताही निधी वापरू हा रस्ता पूर्ण करावा. अन्यथा येत्या १५ दिवसांनंतर नगरसेवकाला काय अधिकार असतात, ते बहुमताने दाखवून देवू. मग जे काही होईल, त्याची जबाबदारी मुख्याधिकारी मोरे यांच्यावर राहील, असा इशारा नगरसेवक श्यामलिंग शिंदे यांनी दिला. नगरसेविका जयश्री शेळके यांनीही या रस्त्याविषयी नागरिकांचे होणारे हाल याविषयी सांगितले.

जाहिरातबाजी आमची संस्कृती नाही.
शहरात दहा लाख रुपयांची कामे झाली आहे. अजूनही विकास कामे सुरू असून गोलगोल बोलणे आपल्या जमत नाही, असे सांगून छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्टर भीमा परदेशी यांच्या नावावरच घेतली जातात व त्यांच्याच नावाने बिले काढली जातात. शासनाचा अद्यादेश असल्याने पावसाळ्यामुळे डांबरीकरणाची कामे करण्यात नाही. जाहिरातबाजी करणं आमची संस्कृती नसल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.

दुभाजक स्वच्छतेचा ठेका ३० हजारांनी वाढला.
शहरातील रस्त्यावरील दुभाजके व झाडे आहेत तीच असून त्यात एकही नविन झाड लावण्यात आलेले नाही. मागील ठेका ६१ हजार रुपयांचा होता. आता दुभाजकातील झाडे व स्वच्छतेसाठीचा ठेका ३० हजार रुपयांनी वाढवून ९३ हजार रुपये करण्यात आला आहे. मात्र, अधिकाऱ्यांना याविषयी व्यवस्थित उत्तर देता आले नाही. तसेच दैनंदिन ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे १५ लाख रूपये अडकले आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. एका ठेकेदाराविरूद्ध न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्यावर तीन महिने उलटूनही कारवाई न झाल्याने उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी हा अधिकाऱ्यांचा बालिशपणा सुरू असून त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नसल्याचा आरोप केला.

शिवाजी महाराज आणि कायद्याची चौकट.
दिवाळीनिमित्त शहरात लावलेल्या शुभेच्छा फलकावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र नाही, असा आक्षेप फंड व नागरे यांनी घेतला. तसेच शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी नगराध्यक्षांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पहाणी केली. वृत्तवाहिनीवर मुलाखतही दिली. मात्र, अद्याप चौकात पुतळा बसला नाही. याठिकाणीच पुतळा बसविण्यासाठी आमचा पाठिंबा असल्याचे उपनगराध्यक्ष ससाणे, फंड, नागरे, बिहाणी यांनी सांगितले. मुक्तार शाह यांनी मुस्लिम समाजाकडून पाच लाख रूपये देण्यात येतील, असे जाहीर केले. 

मात्र, नगरसेवक अंजुम शेख यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पुतळ्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्षांनीही कायद्याच्या विरोधात जाता येणार नसल्याचे जाहीर केले. यावर विरोधकांनी आक्षेप घेत नगराध्यक्षांनीच पुतळा शिवाजी चौकातच बसविण्याचे जाहीर केले होते. आता त्यावर राजकारण सुरू असून निवडणुकीपूर्वी सत्तेवर आल्यानंतर तिसऱ्या दिवशीच पुतळा बसविण्याचे जाहीर केले होते. आज वर्ष होत आले असतानाही पुतळा बसविला नसल्याने त्याचा निषेध नोंदवित असल्याचे ससाणे यांनी सांगितले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.