वकील महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका वकील महिलेच्या गळयातील मणिमंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरटयांनी लांबवले. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस उपनिरीक्षक कुंडलिक पावसे तपास करीत आहेत.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शहरात वकिली व्यवसाय करणाऱ्या आनंदनगर भागात राहणाऱ्या एक महिला सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाथर्डी -शेवगाव रस्त्याने आनंदनगर येथील घराकडे पायी जात होत्या. याचवेळी मोटारसायकलवरून दोघेजण पाठीमागून आले. या वेळी अंधार पडलेला होता. 

चोरटयांनी सोमठाणे रस्ता कुठे आहे,अशी विचारणा महिलेकडे केली. यावेळी एका जणाने महिलेच्या गळयातील सोळा ग्रॅम सोन्याचे मणिमंगळसूत्र तोडून पसार झाले. याप्ररणी या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

पोलिस उपनिरीक्षक कुंडलिक पावसे तपास करीत आहेत. शहरातील जुने व नवीन बसस्थानक परिसर, आठवडा बाजारात व भाजीपाला बाजारात मोबाईल चोर, दागिने चोर, पाकीटमार यांचा वावर दिवसेंदिवस वाढला आहे. पोलिसांचा कोणताही धाक गुन्हेगारांना वाटत नाही. 

झालेल्या चोऱ्यांचा तपासही लागत नाही. मोटारसायकल चोरीचे प्रमाणही वाढले आहे. शहरात महिला, व्यापारी, शाळकरी मुली कुणीही सुरक्षित नाही हे वास्तव आहे. पोलिसांनी चोरटयांच्याविरोधात मोहीम राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.