प्रेम संबधातून पुण्यातील युवकाचा कर्जत येथे खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे-कोथरूड येथून अपहरण करत एका युवकाचा चार ज़णांनी कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात आणून खून करण्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कर्जत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार- पुणे -कोथरूड परिसरातून शेखर लक्ष्मण पाचवे ऊर्फ शेखर दशरथ कंधारे (वय २५ वर्षे ,रा. चिंचवड, ता. मुळशी, जि. पुणे) या युवकाचे अपहरण करण्यात आले होते. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्यास कोथरूड येथून वाहनातून कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी ते चांदा बुद्रुक रस्त्यावरील तुकाई टेकडी येथील चारीत आणून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुरन ४०३-२०१७ भादंवि कलम ३६४,३४ नुसार सौरभ विलास कंधारे (वय-२३ रा. एरंडवना-पुणे), प्रमोद वाघ रा. पुणे व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून सौरभ कंधारे व प्रमोद वाघ यांना अटक केली आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

अधिक तपासात सौरभ कंधारे याने कोथरूड पोलिसांना कर्जत तालुक्यातील घटनास्थळ दाखविले. त्यावरून या घटनेचा पोलिस पंचनामा करून कोथरूड येथील पोलिस उपनिरीक्षक ए.सी.जोगदंड ,कर्जत पोलिस ठाण्याचे प्रभारी पोनि एम.पी. इडेकर,पोहेकॉ. दादासाहेब भापकर यांच्या मदतीने घटनास्थळचा पंचनामा करत कर्जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.