पालकमंत्री शिंदेंचा पाहुणचार विखे पाटीलांनी स्वीकारला आनंदात!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या गोड-धोड मेजवाणीचा पाहुणचार विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आनंदात स्वीकारला. ना. शिंदे यांच्या कार्यक्रमास राजकीय पक्षातील नेत्यांची मोठी गर्दी उसळली होती. ----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
ना. विखे यांनी आपले व ना. शिंदे यांची राजकारण विरहीत असलेल्या मैत्रीचा जाहीरपणे उलगडा केला. राजकारणापेक्षा मी मैत्रीला जास्त महत्त्व देतो, असेही त्यांनी आवुर्जनपणे नमूद केले. ना. विखे यांनी ना. शिंदे यांचे तोंडभरून कौतुकही केले. ना. विखे यांची उपस्थितीत आणि त्यांच्या त्या वक्तव्यामुळे उपस्थितांना एका प्रकारचा आश्चर्याचा धक्काच बसला.

ना. विखे पाटील म्हणाले की, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा हा राजकीय कार्यक्रम नसून खासगी आहे. मी, कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेता असून, ते भारतीय जनता पार्टीचे व राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राजकरणाविहित आमचे मैत्री आहे. सत्ता आज आहे, उद्या नाही, हे राजकारण आहे; परंतु मैत्री ही कायमस्वरुपी राहणारे नाते आहे. ते जपण्याचे काम ना.शिंदे यांनी केले आहे.
मी मैत्री जपणारा आहे. ना. शिंदे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला असून, स्वत:च्या कतृर्त्ववाने आणि चातुर्याने ते गावचे सरपंच झाले. आता ते राज्याचे कॅबिनेटमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आजही ते सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहेत. त्यामुळे आम्ही राजकारण बाजूला ठेवून मैत्रीखातर या कार्यक्रमासाठी आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. ना. विखे यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हा चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
चोंडी ( ता. जामखेड ) येथे आयोजित कार्यक्रमास उद्योजक,पत्रकार, तसेच अहमदनगर, बीड, सोलापूर, पुणे, मुंबई, सातारा, बारामती, इंदापूर, कर्जत -जामखेड मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश दिवटे यांनी केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------- 
Powered by Blogger.