गॅस सिलेंडर भरलेला ट्रक व कारचा भीषण अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भरलेले गॅस सिलेंडर घेऊन चाललेला मालवाहू ट्रक व इऑन कारची धडक होत झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जबर जखमी झाले. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लोणी- नांदूरशिंगोटे रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला गावानजीक ही घटना घडली.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सिन्नर येथून मालवाहू ट्रकमध्ये (क्र. एमएच १६ एइ ३५१२) भरलेले ४५० गॅस सिलेंडर भरून चालक लक्ष्मण भागुजी मेहेत्रे (रा. नगर) हे नगरच्या नगरच्या दिशेने ट्रक घेवून चालले होते. त्याचवेळी नान्नजदुमाला गावानजीक समोरून आलेल्या नाशिकच्या दिशेने चाललेल्या इऑन कारची (क्र. जीजे ०६ एलबी ३८८१) व मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली.

यात कारमधील प्रज्ञेश गिरीशकुमार राव (वय ३६) व पद्मा गिरीशकुमार राव (वय ५२ रा. वरोदा, गुजरात) हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसंगी स्थानिक रहिवाशांनी मदतकार्य केले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

राव कुटुंबीय शनिशिंगणापूर येथून दर्शन घेवून गुजरातकडे परतीचा प्रवास करीत होते. दरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातात इतका भीषण होता की, पश्चिमेच्या दिशेने चाललेल्या इऑन कारचा दर्शनीभाग पूर्वेकडे फिरला. 

अपघाताची माहिती समजताच हे. कॉ. किशोर पालवे यांनी घटनास्थळी येवून पाहणी करीत माहिती घेतली. मालवाहू ट्रकमध्ये भरलेलेले ४५० गॅस सिलेंडर होते. सदर मालवाहू ट्रक उलटला असता तर मोठी दुर्घटना घडलीअसती, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत मालवाहू ट्रक रस्त्याच्याकडेला उभा केला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

अपघातात इऑन कारच्या दर्शनीभागाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असे हे. कॉ. किशोर पालवे यांनी बोलताना सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.