एकच भाई, पोलीस भाई !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाळूतस्करीच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीद्वारे चन्या बेग टोळींने नगर, नाशिक, औरंगाबादसह अन्य ठिकाणी धुमाकूळ घालत आपले साम्राज्य निर्माण करू पाहिले. मात्र, दोन मोक्क्याच्या गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय आश्रय शेधाणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्यांच्या भोवतीचा फास घट्ट करताना त्यांनी केलेले नवनवीन कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. याच टोळीचा भाग असलेला शाहरूख व अन्य दोघांना नाशिकला जेरबंद करण्यात आले. त्यांची आज त्यांच्याच चितळी (ता. राहाता) गावात धिंड काढत येथील जनमाणसावर असलेली दहशत दूर करण्याचा प्रयत्न केला. .

शाहरूख रज्जाक शेख (वय २५, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), सागर सोना पगारे (वय २२) व बारकू सुदाम अंबोरे (वय २१, दोघे रा. चितळी, ता. राहाता) यांना नाशिक येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नाशिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान जेरबंद करण्यात आले. 

त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व ४० जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच आजही श्रीरामपूरातुन एक कार ताब्यात घेण्यात आली आहे. शाहरूख आणि अन्य दोघांची चितळी परिसरात मोठी दहशत होती. यातूनच त्याने एका तरुणावर गोळीबार केला होता. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

तसेच तो कोपरगाव न्यायालयातून बेड्यासह पळाला होता. आज सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शाहरूख, सागर व बारकू यांची चितळी गावातून धिंड काढली. ही वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. यावेळी बघ्यांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. चितळी गाव व स्टेशन परिसरात चौकातून त्यांना फिरविण्यात आले. यावेळी सागर व बारकू हे 'चन्या आणि शाहरूख सोबत मुंबई पाहिली आणि ...' असे बोलत असल्याचे अनेकांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून या तिघांकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. शाळा परिसरात मुलींना त्रास देणे, ज्येष्ठांशी असभ्य वर्तन करणे हे नित्याचेच झाले होते. मात्र, आज त्यांची धिंड काढल्याने कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असा संदेशच एकप्रकारे पोलिसांकडून देण्यात आला. 

यावेळी अनेक तरुणांना महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, 'एकच भाई, पोलीस भाई' अशा घोषणा देत या कारवाईबद्दल आपला आनंद व्यक्त केला. दरम्यान, यासंदर्भात विचारले असता पोलिसांनी धिंड नव्हेतर तपासासाठी त्याला गावात नेल्याचे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.