"ऋणानुबंध" मेळाव्यात १२ लाखांचा मदत निधी जमा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एकविसाव्या शतकातील झपाट्याने होणारे बदल व त्याप्रमाणे माणसाच्या जीवनात होणारे परिवर्तनाची गती लक्षात घेता पारंपारिक शिक्षण पद्धतीत बदल घडविणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा व नवनवीन अध्यापन कौशल्य आत्मसात केल्या खेरीज या जीवघेण्या स्पर्धेत आपला निभाव लागणे शक्य नाही, असे मत निंबळक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन सातपुते यांनी अध्यक्षीय व्यक्त केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
निंबळक येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित "ऋणानुबंध" माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.१९८५ ला स्थापन झालेल्या विद्यालयाची प्रथम बँच ते २००८ पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद लाभला.१ हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली. विद्यालयाचे विद्यार्थी देशातील विविध भागांत तसेच विविध क्षेत्रात नोकरी- व्यवसायानिमित्त असून देखील या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल एकवीस वर्षे एकत्र आले.

अनेकांनी मनोगते व्यक्त केली. यांमधून शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना भावना दाटून आल्या.कार्यक्रमाच्या सुरवातीस माध्यमिक विद्यालयाच्या वाटचालीची चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. प्रास्ताविक करताना कोतकर बी. एन. यांनी विद्यालयाच्या यशाचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला.त्यासाठी योगदान येणाऱ्या व्यक्तींच्या आठवणींना उजाळा दिला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी महासंघाचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. निवेदन शिक्षिका जाजगे एस. बी. व ओंकार खुंटाळे यांनी केले, तर आभार कोतकर बी. एस. यांनी मानले.

मेळाव्याच्या निमित्ताने शाळा डिजिटल करण्याची संकल्पना मांडण्यात आली. यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी सहमती दर्शवत निधी संकलनासाठी प्रयत्न सुरू केले . सोशल मीडिया च्या मदतीने तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून निधी संकलित करण्याबाबत अवाहन करण्यात आले होते. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

तब्बल ४५ दिवस कार्यक्रमाची आयोजनाबाबत बैठकांचे सत्र सुरू होते. मेळाव्यात तब्बल १२ लाखांचा निधी जमा झाल्याची जाहीर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या निधीतून १२ एलईडी संच आणि १३ साऊंड संचाची खरेदी करण्यात आली. ते कार्यक्रमादरम्यान विद्यालयाला सुपूर्त करण्यात आले.

डिजिटल म्हणजे साध्य नाही: जाजगे 
डिजिटल शाळा करणे म्हणजे साध्य नसून तंत्रज्ञानाचा व अत्याधुनिक साधनांचा वापर करून अध्यापन कौशल्यात सुधारणा घडवून चांगला परिणाम घडविणे, हेच डिजिटलायझेशनचे साध्य आहे असे मत गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त सूनील जाजगे यांनी व्यक्‍त केले. ते सन 1990 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.

शिक्षकाने स्वतः अपडेट ठेवणे गरजेचे आहे
प्रत्येक शिक्षकाने स्वतः अपडेट ठेवणे गरजेचे आहे. शिक्षकांनीदेखील गुगल व युट्यूब या दोघांची मैत्री साधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागविणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे ,असे मनोगत व्यक्त करताना श्री. जाजगे म्हणाले

अविस्मरणीय दिवस...
 माध्यमिक विद्यालयाचा हा पहिला-वहिला मेळाव्यास लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. जुन्या मित्रांसोबत आठवणी, गप्पा व गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका हे सर्व क्षण विद्यार्थी व शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले. अनेकांनी हा दिवस नेहमीच स्मरणात राहील, असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.