नगरच्या ७३ धार्मिक स्थळांवर केव्हाही हातोडा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने १९६० पूर्वीची आणि नंतरची धार्मिक स्थळे निश्चित केली असून, १९६० नंतरच्या ७३ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. या ७३ धार्मिक स्थळांपैकी पाच धार्मिक स्थळे ही खाजगी जागेत आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------
महापालिका प्रशासनाने यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठवून कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी आज पोलीस अधीक्षकांची धावती भेट घेतल्याचे समजते. दरम्यान या कारवाईसाठी महापालिकेला ३० तारखेला पोलिस बंदोबस्त मिळणार असल्याची माहिती उपायुक्त विक्रम दराडे यांनी दिली.

जनहित याचिकेवर सवार्ेच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर २००९ रोजी आदेश करत धार्मिक स्थळांची 'अ', 'ब' आणि 'क' अशी वर्गवारी करावी. रहदारीला, रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी जी धार्मिक स्थळे येतात ती निसकासित करावी असा आदेश दिला आहे. 

या आदेशानुसार अहमदनगर महापालिकेच्या नगररचना कार्यालयाने १९६० पूर्वीची आणि नंतरची अशी १०४ धार्मिक स्थळे निश्चित केली आहे. १९६० पूर्वीची असलेल्या ३१ धार्मिक स्थळांचा अहवाल राज्यस्तरीय समितीकडे पाठवून त्यावर कारवाईची सूचना मागितली आहे. १९६० नंतरची ६८ धार्मिक स्थळे आहेत. त्यात पाच धार्मिक स्थळे ही खाजगी जागेतील आहेत. अशी एकूण ७३ धार्मिक स्थळांवर महापालिकेने कारवाई निश्चित केली आहे.

कारवाईसाठी महापालिकेकडून तयारी पूर्ण 

या ७३ धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी महापालिकेकडून तयारी पूर्ण झाली आहे. ही धार्मिक स्थळे ज्या परिसरात आहे, त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा अभिप्राय आणि बंदोबस्त मागितला आहे. त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षकांची धावती भेट घेऊन कारवाईची कल्पना दिली. ही कारवाई महसूल, पोलीस आणि महापालिका अशी संयुक्त होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
                                                         ------------------------------------
पहिल्या टप्प्यात या ७३ मंदिरावर होणार कारवाई.
पावन खंडोबा मंदिर हेमांडपथी (सावेडी, परिवार हॉटेल मागे), जय लक्ष्मीमाता मंदिर (नगर-मनमाड रोड, हुंडेकरी शोरूम समोर सावेडी), मारुती मंदिर (नगर-मनमाड रोड, हॉटेल ओबेराय समोर सावेडी, पावन लक्ष्मीमाता मंदिर (औरंगाबाद रस्ता, सिटी सर्व्हे ऑफिस), दत्त मंदिर (क्रीडा संकुल, सावेडी मनपा), पावन दत्त मंदिर (पाइपलाइन रोड, मोरया मंगल कार्यालयाजवळ), पावन गणेश मंदिर (बोल्हेगाव) दत्त मंदिर (पदमावती हॉस्पिटल जवळ, पाइपलाइन रोड), म्हसोबा मंदिर (भिस्तबाग चौक), मुंजोबा मंदिर (मनपा ऑफिसपुढे नागापूर) शनी मारुती मंदिर (केवळ हॉस्पिटल समोर, माळीवाडा), मुंजोबा मंदिर (सातपुते तालीम समोर), तुळजाभवानी मंदिर (गौरी घुमट) चिंचेचा म्हसोबा (सातपुते तालिम जवळ), दत्त मंदिर गणेश मंदिर गणपती मंदिर (हलवाई गल्ली), संत गोरोबा मंदिर (कुंभारगल्ली, नालेगाव), देवके मारुती मंदिर (रोहकले गल्ली, नालेगाव), सिध्दी विनायक मंदिर (मानकर गल्ली), गणपती मंदिर (पंचरंग गल्ली, तोफखाना), मुंजोबा मंदिर (चेतन व्हिडीओहॉलजवळ, तोफखाना), मुंजोबा मंदिर (मोची गल्ली, तोफखाना), मारुती मंदिर (ठाकुर गल्ली, तोफखाना), गणपती मंदिर (महाजन गल्ली), गुरूदेव दत्त मंदिर (कोर्टामागे), गणपती मंदिर (राजमल लखमीचंद ज्वेलर्स मागे, गांधी मैदान), श्री काष्ट गणेश मंदिर (बागडपट्टी), राधाकृष्ण मंदिर (रंगार गल्ली), गणपती मंदिर (काटे गल्ली), साईबाबा मंदिर (लोणार गल्ली), गणपती मंदिर (ख्रिस्त गल्ली), दत्त मंदिर (गोंधळे गल्ली), गणपती मंदिर (नांगरेगल्ली बाळासाहेब देशपांडे दवाखान्यामागे), पावन हनुमान मंदिर (गाडगीळ पटांगण), तुळजा भवानी मंदिर (झारेकर गल्ली), वेताळ बाबा मंदिर (संभाजी महाराज व्यापारी संकुलाजवळ), मुंजोबा मंदिर व गणपती मंदिर (भोपळेगल्ली, माळीवाडा), दुर्गा माता मंदिर (तोफखाना, विजया रेसिडेन्सिल मागील गल्ली), बालाजी गणपती मंदिर (तोफखाना, जगदंबा भांडी बाजारजवळ), मुंजोबा मंदिर, म्हसोबा मंदिर, मुंजोबा मंदिर (तिन्ही ठिकाणचे मंदिर सांगळे गल्ली, गुंदेचा घरामागे), मोहटा देवी मंदिर (कल्याण रोड पुलाशेजारी), लक्ष्मी माता मंदिर (जाधव यांचे शिवनेरी हाईस्ट समोर, कल्याण रोड), सूर्यमुखी विठ्ठल मंदिर (गाडगीळ पटांगण, नालेगाव), वैष्णवी माता मंदिर (लालटाकी चौक), साईबाबा मंदिर (लालटाकी चौक), गणपती मंदिर (वरद कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड), दत्त मंदिर (पंपिंग स्टेशन रोड, भूतकरवाडी), वैष्णवी माता मंदिर (सिव्हिल हॉस्पिटल), शितळा देवी मंदिर बालिकाश्रम रोड, ढोर वस्ती), गणेश मंदिर (रविश रो-हौंसिंग, कायनेटिक चौक), शितळा देवी मंदिर (लक्ष्मी हॉटेल समोर, नेप्ती रोड), गणेश मंदिर (आयटीआय, अकोलकर हॉस्पिटलसमोर), तुळजाळवानी मंदिर (मुंजोबा स्वीट कॉर्नर, मार्केट यार्ड चौक), देवी मंदिर (जिजामाता उद्यान समोर, इंद्रप्रस्थ कार्यालयशेजारी), शनी नागेश्वर मंदिर (जिजामाता उद्यान, भवानीनगर), वेताळेश्वर मळा (इवळे मळा, सारसनगर), हनुमान मंदिर (रेल्वे स्टेशन रोड, मल्हार चौक), लक्ष्मी माता मंदिर (जगदंबा किराणा शेजारी, मल्हार चौक), राशीन देवी मंदिर (केडगाव देवी रोड), मोहटादेवी मंदिर (शाहूनगर चौक, केडगाव), लक्ष्मीमाता मंदिर (वेअर हाऊस, केडगाव देवी मंदिरासमोर), शनिवार देवी (अकोळनेर रोड), खंडोबा मंदिर (अकोळनेर) आणि इतर पाच खाजगी जागेतील मंदिर.

महापालिकेकडे राहिले २५ दिवस.
महापालिकेला या धार्मिक स्थळांवर कारवाई करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश देताना कारवाईची कालमर्यादा ठरावून दिली आहे. त्यानुसार महापालिकेला १७ नोव्हेंबरपर्यंत ही कारवाई पूर्ण करायची आहे. महापालिकेकडे आता २५ दिवसांचा वेळ राहिला आहे. संवेदनशील विषय असल्याने महापालिका करत असलेली कारवाई खूपच सावकाश आहे. त्यामुळे महापालिका अडचणीत येऊ शकते. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होत आहे. यात कोणीही अडथळा केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे सांगून कारवाई सुरू झाल्यावर ते जलद गतीने होईल, असे सांगितले जात आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.