राहुरीत दगडाने तोंड ठेचून अज्ञात तरूणाचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विविध प्रकरणामुळे राहुरी तालुक्यातील कायम चर्चेत असलेल्या धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी सोमवारी (दि. २३) ऑक्टोबर रोजी सकाळी एका ३० ते ३५ वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने तोंड ठेचून सदर तरूणाचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोठी खळखळ उडाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान एका अज्ञात तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह काही लोकांना दिसून आला. त्याच्या चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता, असे प्राथमिक स्वरुपात दिसत होते.

परिसरातील झाडाझुडपात त्याची चप्पल व अंडरपॅन्ट आढळून आली. राहुरी खुर्दचे पोलीस पाटील बबनराव आहिरे यांनी त्वरित राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक अरुण जगताप, राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, ठसे तज्ज्ञ सहाय्यक निरीक्षक श्रीमती धुमाळ, सुभाष सोनवणे, हवालदार संजय शिंदे, संजय पटारे, राहुल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावेळी नगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. विरकर यांनी आणलेल्या मिस्का श्वान जागेवरच घुटमळले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.या घटनेबाबत राहुरी पोलिसांत पोलीस पाटील बबनराव आहिरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत. 

सदर तरुणाची ओळख पटली नसल्याने तपास करणे अवघड जात आहे. सदर तरुण कुठला, त्याचा खून कोणी व कोणत्या कारणाने केला याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सदर खून हा वाळू तस्करीतून झाला की, अनैतिक संबंधातून याबाबतही उलटसुलट चर्चा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.