करंजी घाटाजवळ अपघात एक ठार, एक जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील विनोद आंबादास जाधव वय २० वर्षे हा जागीच ठार झाला. तर अनिल राठोड वय २२ वर्ष हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------
दोघेही मराठवाडी ता.आष्टी येथील रहीवासी आहेत. या अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन मात्र त्या ठिकाणाहुन पसार झाले. अपघाताची माहिती मिळताच मयत जाधव याच्या कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या तरुण मुलाचा रक्तने माखलेला मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहुन विनोदच्या आई वडिलांना मात्र आश्रू आवरता आले नाहीत. 

१०८ नंबरची रुग्णवाहिका तिसगावहून येण्यास बराच उशिर झाल्याने सुमारे पाऊणतास या मुलाचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. नंतर मात्र दोघांनाही नगरला हलवण्यात आले. अपघाताची माहिती कळताच बाळेवाडीचे सरपंच प्रकाश पालवे,विकास मराठे यांच्यासह मराठवाडी,हारेवाडी, करंजी येथील अनेकजणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
करंजी घाटात वारंवार अपघात होतात. त्यामुळे जखमींना उपचारासाठी नगर अथवा इतर ठिकाणी हलवण्यासाठी शेवगाव येथील १०८ नंबरच्या रूग्णवाहिकेस फोन केल्यानंतर तीला घटनास्थळी येण्यास बराच अवधी लागतो.यामुळे अनेक जखमींना आपला प्राणही गमवावा लागतो. त्यासाठी करंजीचे सरपंच रफिक शेख यांनी यापूर्वीच करंजी येथील उपआरोग्य केंंद्रासाठी एक १०८ नंबरची रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती.या घटनेने पुन्हा ही मागणी जोर धरत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.