शिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :हल्ली समाजात इमानदारी विश्वास हा समाजात राहिला नाही, असे अनेकजन म्हणतात.पण तसेच काही अजूनही चांगली माणसं समाजात आहेत. हे सत्य नाकारून चालणार नाही. कारण याची अनुभूती म्हणजे एका विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रामाणिकपणामुळे एका गरीब व्यावसायकाची दिवाळी गोड झाली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------
समाजात प्रामाणिक माणसं आहेत, याचीही थोडी जाणीव झाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील शिक्षक सुनील बापूराव गिरमकर हे आपल्या कामानिमित्त दि.१८ रोजी दौंड तालुक्यातील वरवंड जि.पुणे येथे नातेवाईक यांच्याकडे गेले असता. सायंकाळी सातच्या सुमारास घरी परत येत असताना दौंड शहराजवळ मदरतेरेसा चौकात रस्त्यावर एक बॅग पडलेली दिसली. 

गिरमकर यांनी आपली मोटारसायकल थांबवून आजुबाजूला कोणी आहे का पाहीले. मात्र कोणी दिसेना म्हणून ती बॅग घरी घेऊन आले, झालेला घटनाक्रम घरच्यांना सांगितला आणि बॅग उघडली. त्यामध्ये कंपनीचे चेक महत्त्वाची कागदपत्रे आणि ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम होती. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
ही बॅग ज्याची असेल त्यांना देण्याच्या विचाराने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क करण्यासाठी पत्ता मिळेना, कागदपत्रावरही पत्ता नव्हता. पण ज्या कंपनीचे चेक होते, त्यांना संपर्क केला असता. कंपनीकडून संबंधित व्यक्तीचा पत्ता व त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावरुन ती बॅग दौंड तालुक्यातील गिरीम येथील वाजिद नजीर पठाण यांची असल्याची खात्री करुन त्यांना दि.१९ रोजी दिवाळीच्या दिवशी काष्टी येथे बोलवून ती मान्यवरांच्या हस्ते परत केली. 

यावेळी पठाण म्हणाले कंपनीच्या कामाचे पैसे घेऊन आनंदाने घरी निघालो होतो. दिवाळी आहे घरी किराणा, मुलांना कपडे घ्यायचे होते. पण घरी गेल्यानंतर गाडीला अडकवून ठेवलेली पिशवी रस्त्यावर कुठेतरी पडली आणि मोठा धक्का बसला. दिवाळी कशी होणार पण देवाच्या मनात होते. आणि काही वेळात गिरमकर यांचा फोन आला बॅग कुठे हरवली, तेव्हा सर्व हकिगत सांगितली आणि बॅग सापडल्याचा आनंद झाला. 

गरीबांचे हरवलेले पैसे कागदपत्र परत मिळाले तेव्हा पठाण यांनी मला पैसे नको फक्त कागदपत्रे द्या असे सांगितले. पण शिक्षक गिरमकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ते नाकारले आणि सर्व पैसे व कागदपत्रे पठाण यांना देऊन त्यांचा पाहुणचार केला. 

यावेळी भगवानराव पाचपुते ॲड.विठ्ठलराव काकडे,भास्कर जगताप,भैरवनाथ कोकाटे,पोपटराव पाचपुत, अरविंद कुरुमकर, पोलिस आबासाहेब पिसाळ, सचिन चोभे,नवनाथ पाचपुते, अमोल कोल्हटकर यांच्यासह अनेकजन हजर होते. सर्वांनी गिरमकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन गरीबांची दिवाळी गोड केली हीच चर्चा दिवसभर गावात होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.