शिर्डी ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला जगाशी जोडणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाचे नुकतेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उद्घाटन केले. यानंतर आता नगर व नाशिक या दोन जिल्ह्यांतून जाणाऱ्या शिर्डी ते सिन्नर या ५४ किलोमिटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------

या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी रस्ते वाहतूक राजमार्ग मंत्रालयाने जमीन संपादनाबाबत नोटीस काढली असून त्यावर २१ दिवसांच्या आत हरकती घ्यायच्या आहेत. ५४ किलोमिटरच्या डांबरीकरण कामासाठी ९५० कोटी तर कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी १२५० कोटी रुपए खर्च अपेक्षीत आहे. 

या महामार्गावर ५०० मीटर लांबीचे दोन फ्लायओव्हरही बांधले जाणार आहे. चौपदरी मार्गास डाव्या बाजुने साडेपाच मीटर लांबीचा संमातर पालखी मार्ग तयार करण्यात येणार आहे. साईबाबा शताब्दी सोहळा ऑक्टोबर २०१८ मध्ये होत असून त्यासाठी या रस्त्याचे चौपदीकरणांचे काम अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. 

साईबाबा धार्मीक स्थान तिरूपती बालाजीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. देश विदेशातुन शताब्दी सोहळयाच्या धर्तीवर पायी पालखीने येणाऱ्या साईभक्तांची संख्या दरवर्षी गुरूपौर्णिमा उत्सव काळात येणाऱ्या भाविकांपेक्षा जादा असणार आहे. त्यासाठी रस्ते अरूंद करून वाहनांची कोंडी कुठेही व्हायला नको, हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
या चौपदरीकरणाच्या कामाबरोबरच सिन्नर ते सावळीविहीर पयंर्त डाव्या बाजुने साडेपाच मीटर लांबीचा पालखी मार्गही तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी जमीन संपादनाचे काम सुरू असल्याचे या प्रकल्पाचे अधिकारी प्रशांत खोडस्कर यांनी सांगितले. 

नाशिकरोड ते शिर्डी हे अंतर ८४ किलोमिटर असून त्यापैकी नाशिकरोड ते सिन्नर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सिन्नर ते शिर्डी हा रस्ता चौपदरी व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. हे काम पुर्ण झाल्यावर यावरून वाहतुक अत्यंत सुकर होईल. 

साईभक्‍तांना प्रवासाचा त्रास होणार नाही. विकास प्रक्रियेतील महत्वाचे स्थान असलेला रस्ता हा यातील अविभाज्य घटक आहे. नाशिक जिल्ह्यातील गुरेवाडी, कुंदेवाडी, मुसळगाव, केदापुर, शहापुर, खोपडी बुद्रुक, पांगरीखुर्द, वावी, फुलेनगर, दुसंगवाडी, पिंपरवाडी, निरगाव, वारेगाव, पाथरे खुर्द, तर कोपरगाव तालुक्‍यातील देर्डे कोऱ्हाळे, सावळीविहिर आदी गावांतील जमिनी यासाठी संपादित केल्या जाणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.