युवा पिढीसाठी सामूहिक उत्सव गरजेचे : खासदार गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सामुहिक सण साजरे करुन आपली परंपरा सध्याच्या युवा पिढीपुढे ठेवणे गरजेचे आहे. आपले सण-उत्सव युवा पिढी दिवसेंदिवस विसरत चालली आहे. या युवा पिढीसाठी असे सामुहिक उत्सव साजरे होणे गरजेचे आहे. शहराच्या विकासासासाठी सर्वांनी एकत्र येवून पक्षविरहित काम केले पाहिजे व शहराचा विकास होवा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले. 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

नगरसेवक किशोर डागवाले व भारतीय जनता पक्षाचे मध्य शहर मंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्यातर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त फराळाचे आयोजन दादा चौधरी शाळेत करण्यात आले होते. खासदार दिलीप गांधी, आमदार संग्रामभैय्या जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेता सुवेंद्र गांधी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, सागर गोरे, सचिन भिंगारकर, गीतांजली काळे, जगन्नाथ निंबाळकर, शौकत शेख, सुनील रामदासी, आशा डागवाले, नानासाहेब भोरे, गणेश शिंदे, अनिल शिंदे, रोहन डागवाले, शेखर देशपांडे, दत्ता गाडळकर, मोहिनीराज गटणे, राजाभाऊ पोतदार,  सूर्यवंशी, तात्या वाडेकर, सचिन पारखी, गोरख डागवाले, सुभाष दारव्हेकर, विशाल भालेराव, नितीन डागवाले आदी उपस्थित होते.

--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
नगरसेवक किशोर डागवाले यांनी २५ वर्षे प्रभागातील नागरिकांबरोबर एक पारिवारिक नाते निर्माण झाले आहे असे सांगितले. नरेंद्र कुलकर्णी यांनी सण-उत्सवामुळे एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. एकत्र येण्याने कमेकांबद्दल आपुलकी निर्माण होऊन एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेता येते असे सांगितले. मराठी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.