शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : ना.राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालूका लहान असूनही मूलभूत सुविधांबाबत विकसनशील असल्याने जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष वेधत आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. अडचणीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन मदत करीन बाजार समितीचा ताण कमी व्हावा, व शेतकऱ्यांना चांगली सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू केले आहे. असे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

ना. शिंदे म्हणाले की मागील वर्षी हे केंद्र आपल्या तालुक्यात नव्हते. आता ही केंद्रे मतदार संघातील जामखेड व कर्जत या ठिकाणी सुरू केले असून, लवकरच मिरजगाव या ठिकाणी देखील हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण सहा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तालुक्यातील शेतीमाल घेऊन येर्णा­या शेतर्क­यांना सुविधा मिळावी व दरोडाई उत्पनात वाढ व्हावी हा मुख्य हेतु आहे.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावेळी प्रस्ताविक करतांना पूण्यश्लोक सहकारी संस्थेचे चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर झेंडे यांनी सांगितले की, शेतकरी हिताच्या सर्व प्रक्रिया या संस्थेच्या वतीने राबविण्यात येतील. येथे संस्थेकडे ४८०० शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत. जे शेतकरी अजूनही नोंदनी करण्याचे राहिले आहेत. त्यांनी तातडीने नोंदणी करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण राऊत, आभार कैलास हजारे यांनी मानले.

पुण्यश्लोक कृषी प्रक्रिया सह.संस्था मर्या.जामखेड तालुका संचलित(नाफेड) जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून शासकीय उडिद, मूग सोयाबीन खरेदी केंद्रचे उद्घाटन पालकमंत्री प्रा राम.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे,अनिल लोखंडे,पणनचे संचालक व संस्थापक अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर झेंडे,बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर,पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती शरद भोरे, पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत मोरे, भा ज पा तालुका अध्यक्ष रवि सुरवसे, माजी सभापती डॉ.भगवानराव मुरूमकर, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात ,उपनगराध्यक्ष महेश निमोनकर,बाजार समितीचे संचालक मकरंद काशिद,पृथ्­वीराज वाळुंजकर,सुभाष जायभाय,पोपट नाना राळेभात,महादेव डूचे,तुषार पवार पाटील,करण ढवळे,काकासाहेब गर्जे, सागर सदाफुले, राजेंद्र कोठारी,विनोद नवले, नगरसेवक अमित चिंतामणी, शामीरभाई सय्यद,ऋषिकेश बांबरसे, राजेंद्र वाव्हाळ, गुलशन अंधारे, संदीप गायकवाड, भाऊराव राळेभात, शाकिरभाई शेख, बिभीषण धनवडे, आशोक शेळके, मोहन पवार, निखिल घायतडक, भाजपाच्या महिला नेत्या सौ. कुसुम खाडे, भाजपाचे युवा नेते संजय गोपाळघरे, बांधखडकचे सरपंच केशव अण्णा वनवे, सचिव वाहेदभाई सय्यद, यांच्यासह सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी शेतकरी कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.