'अगस्ती' व 'अमृतसागर' मुळे अकोल्याची बाजारपेठ फुलली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील शिखर संस्था अगस्ती सहकारी साखर कारखाना व अमृतसागर दूध संघाने दिवाळीनिमित्त सभासदांना सुमारे २१ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याने अकोल्याची बाजारपेठ फुलली असल्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी म्हटले आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात दिपावलीनिमित्त लक्ष्मीपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पिचड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले, संचालक प्रकाश मालुंजकर, राजेंद्र डावरे, मिनानाथ पांडे, अशोक देशमुख, गुलाबराव शेवाळे, कचरू शेटे, मच्छिंद्र धुमाळ, रामनाथ वाकचौरे, नानासाहेब देशमुख, सुनिल दातीर, महेश नवले, भास्कर बिन्नर उपस्थित होते.

कारखान्यातील तिजोरीचे पिचड यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी पिचड पुढे म्हणाले की, अगस्ती सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम पेमेंट, कामगारांना पगार,बोनस, ऊस तोडणी कामगार, ट्रकमालक यांना एकूण १६ कोटी तर अमृतसागर दूध संघाने सुमारे साडेपाच कोटी रुपये दूध उत्पादक शेतकरी, कामगार यांना दिवाळीनिमित्त उपलब्ध करून दिले. 

यामुळे अकोल्याच्या बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे. जिल्हा बँकेने कारखान्याला १ कोटी रुपयांचे रिबेट दिले. राज्य बँकेने ३ कोटी रुपये कमी व्याजदराने उपलब्ध करून दिले. त्यामुळे कारखाना प्रगतीपथावर आहे. उसाला आता बरे दिवस आहेत. त्यामुळे ऊस वाढीसाठी आता प्रयत्न करा, असेही आवाहनही पिचड यांनी केले.

आ.वैभवराव पिचड म्हणाले, राज्यात भाजपाचे भुलभुलैय्याचे सरकार असून मोदींचे 'अच्छे दिन' कधी येणार? याची वाट पहात बसलेला सर्वसामान्य माणूस,शेतकरी, कष्टकरी, कामगार नैराशात आहे. शेतकरी कर्जमाफीच्या फक्त घोषणाच होत आहेत. प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.