संगमनेर तालुक्यात ऊस जळून खाक,शेतक-याचे लाखोचे नुकसान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारात गुरुवार रोजी रात्री दौलत बनवाले व भिमराज शिदें या दोन शेतक-याचा सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाल्याने या शेतक-याचे सुमारे चार ते पाच लाख रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दौलत बनवाले याची ओझर खुर्द शिवारात गट नं १७२ मध्ये तीन एकर ऊसाची शेती आहे. त्यापैकी दोन एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाला आहे. तर भिमराज शिदें याची गट नं १२६ मध्ये एक एकर ऊसाची शेती आहे त्यालाही आग लागली होती. यावेळी नागरीक, तरुण व संगमनेर कारखाण्याच्या अग्निशामक दलाने दाखवलेल्या प्रसंग सावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. कारण या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे.

गुरवार रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता व हे ऊस क्षेत्र असलेल्या परिसरात वीजेचे खांब अथवा वीज वाहक तारा नाहीत. तर ऊस असलेल्या परिसरात कोणीही वास्तव्यास नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यंक्तीने जाणीवपूर्वक या दोन्ही शेतक-याचा ऊस जाळला असून या व्यक्तीला कठोर शासन करावे अशी मागणी या शेतक-यानी आश्वी पोलिसाना दिलेल्या तक्रांर अर्जात केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.