मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून सरकारी धोरणांनी केलेले खून आहेत. परदेशातील चढ्या भावाने कांदा, डाळी, साखरेची आयात करून व शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने लादून शेतकऱ्यांना सरकारने देशोधडीला लावले आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा यासह इतर मागण्यांसाठी शहर पोलीस ठाण्यावर काल मोर्चा नेण्यात आला.

राज्य सुकाणू समितीचे सदस्य, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष अहमद जहागिरदार व लाल निशान पक्षाचे जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी बलीप्रतिपदेचे औचित्य साधून कृषीसम्राट बळीराजाच्या प्रतिमेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शहर पोलीस स्टेशनपर्यंत गौरव मिरवणूक काढण्यात आली. 

शेतकरी सुकाणू समितीच्या आंदोलनास श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडधे, नगरसेवक राजेंद्र पवार, मार्केट कमिटी संचालक कैलास बोर्डे, आरपीआयचे सुभाष त्रिभुवन यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.