श्रीरामपूर तालुक्यात फटाक्यामुळे तीन ठिकाणी आग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या असुन या आगीत एका व्यापाऱ्याचे दोन ते आडीच लाख रुपयाचे नुकसान झाले. एका व्यापाऱ्याचे पोलीसाच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले तर एका शेतकऱ्याचा दहा गुंठे ऊस जळून खाक झाला.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बेलापूरातील बाजारवेस येथील व्यापारी बाळू दायमा यांच्या दुकानात बाहेर ठेवलेल्या नारळाच्या गोणीत जळता फटाका पडला. ही बाब कुणाच्याही लक्क्षात आली नाही .त्यांनी ती गोणी तशीच दुकानात ठेवून दुकान बंद केले . रात्री गस्त घालणारे पोलीस नाईक गणेश भिंगारदे, अतुल लोटके, आर्जुन पोकळे, राहुल सोळूंके यांनी दुकानातुन धुर निघताना पाहीले. त्यांनी तातडीने आसपासच्या नागरिकांना उठविले.

त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दुसरी घटना बेलापूर बाजार समितीच्या आवारात घडली. बाजार सामितीच्या गोदामास अचानक पहाटे चार वाजता आग लागली. या आगीची वार्ता तेथील पहारेकऱ्यांनी तातडीने बाजार समितीचे सभापती सचिन गुजर ,संचालक सुधीर नवले यांना कळविली. सभापती सचिन गुजर स्वत: श्रीरामपूरहून अग्निशामक दलाची गाडी घेवुन आले. 

सुभाष चांदमल देसर्डा यांच्या गोदामात हार्डवेअरचे सामान ठेवलेले होते. गोदामाबाहेर असलेल्या प्लॅस्टिक पाईपने पेट घेतला. त्यामुळे आग चांगलीच भडकली. त्या ठिकाणी असलेल्या दोन टेम्पोने देखील पेट घेतला. वेळेवर आग विझल्यामुळे पुढील अनर्थ टळला. विलास मेहेत्रे यांच्या ऊसाच्या शेतात पेटता फटाका पडला, त्यामुळे ऊसाने पेट घेतला. ही बाब मेहेत्रे यांना समजताच त्यानी मोठ्या प्रयत्नाने आग विझविली. तरी देखील या आगीत त्यांचा दहा गुंठे ऊस जळून खाक झाला.

बेलापूर बाजार समितीच्या असलेल्या गोदामास आग लागल्याचे समजताच सभापती सचिन गुजर तातडीने अग्निशामक बंब घेवून आले. गुजर यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे त्या ठिकाणी असणारी चार ते पाच व्यापाऱ्यांची गोदामे थोडक्यात वाचली. गोदाम मालक सुभाष देसर्डा घटनास्थळी पोहोचण्या आगोदरच सभापती सचिन गुजर, संचालक सुधीर नवले हजर होते. दोन दिवसापूर्वीच या व्यापाऱ्यांना गोदाम खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.