नेवासा तालुक्यात नवीन रस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दिपावलीच्या मुहूर्तावर नेवासा तालुक्यात ५ नवीन रस्ते कामांना सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१७ अंतर्गत नगर जिल्ह्यातील १४ नवीन जोडणी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी नेवासा तालुक्यात सर्वात जास्त ५ नवीन कामांना ही मंजुरी मिळाली आहे. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तालुक्यातील प्रत्येक गाव व वाड्यावस्ती पक्या रस्त्यांनी जोडले जावे यासाठी महाराष्ट्र शासन रस्त्यांच्या कामांवर भर देत आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील नवीन रस्त्यांची जोडणी सुरु झाली आहे. नेवासा तालुक्यातील सर्वच छोटी छोटी गावे रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यासाठी आ.बाळासाहेब मुरकुटे सुरुवातीपासून प्रयत्नशील व पाठपुरावा करत आहेत. व याचे हे फलित नेवासा तालुक्याला मिळाले आहे.

या ५ कामात चांदा ते खडकवस्ती (१.२९ कि.मी.), देडगाव ते देवी वस्ती (२.२ कि.मी.), जैनपूर ते आडवट वस्ती (१.५९ कि.मी.), चांदा ते समतानगर (१.३५ कि.मी.), तेलकुडगाव ते घोडेचोर वस्ती (१.३५ कि.मी.) या ५ कामांना मंजुरी मिळाली असून सदरच्या ५ कामांची किंमत सुमारे साडे पाच कोटी रुपये आहे. त्यामुळे या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

या कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बाधकाम मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, वित्त राज्यमंत्री ना.दीपक केसरकर व पालकमंत्री ना.राम शिंदे यांची मोठी मदत झाली.आतापयंर्त तालुक्यातील ९ रस्ते कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ३९ कोटी रुपये मिळाले असल्याचे आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले. तसेच विशेष म्हणजे या ५ नवीन रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची शासनाने जबाबदारी घेतली असून २६ लाख रुपयांची तरतूद देखील यासाठी करण्यात आली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.