श्रीगोंदा तालुक्यात चोरटयांच्या मारहाणीत चौघे जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारातील शिंदेवस्ती व हिरडगाव येथील चिंचकूटवस्तीवर काल गुरुवार दि.१९ रोजी मध्यरात्री साडेबारा ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यात चिंचकुटवस्तीवरील हरिभाऊ भाऊसाहेब दरेकर (वय ३५) व त्यांच्या पत्नी राणी हरिभाऊ दरेकर तर कोकणगाव शिवारातील शिंदे वस्तीवरील संतोष संपत शिंदे व त्यांचे वडील संपत अंकुश शिंदे हे दोघे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
संतोष यांच्या आईलादेखील चोरट्यांनी किरकोळ मारहाण केली. या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या जबरी चोरीच्या घटनेमध्ये राणी दरेकर यांच्या हात, डोळे व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर त्यांचे पती हरिभाऊ यांच्या डोक्याला मार लागला आहे.

याबाबत माहिती अशी कि तालुक्यातील हिरडगाव येथील हिरडगाव फाट्यानजीक असलेल्या चिंचकूट वस्तीवर राहणारे हरिभाऊ दरेकर हे कुटुंबासह या वस्तीवर राहातात. नेहमीप्रमाणे रात्री हे सर्वजण जेवण करून साडेदहा वाजण्याच्या सुमारास झोपले. 

हरिभाऊ दरेकर त्यांच्या पत्नी व दोन्ही मुले हे हॉलमध्ये झोपले होते तर त्यांचे आई-वडील दुसऱ्या बेडरूममध्ये झोपले होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दरेकर यांच्या पत्नीच्या ऊषाशेजारील पहिल्या बेडरूमची चावी घेऊन त्यांनी बेडरूमचे कुलूप उघडले. 

कपाटाचा आवाज आला त्यामुळे दरेकर पती पत्नी जागे झाले. त्यांनी डोळे उघडून पाहिले असता त्यांच्या उशाला उभे असणाऱ्या दोघा चोरट्यांनी त्यांचे हातातील लोखंडी गज, टॉमीने हरिभाऊ दरेकर यांच्या डोक्यात, तोंडावर, पायावर मारहाण करून त्यांच्या पत्नी राणी यांना डोक्यात व उजव्या हातावर तोंडावर गजाने मारले. 

त्यानंतर चोरांमधल्या एकाने दरेकर यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढले. दरेकर यांनी मोठ्याने आरडाओरडा केला तेव्हा चोरटे घरातून पळाले त्यानंतर त्यांच्या आजूबाजूचे लोक जमा झाले व दरेकर त्यांच्या पत्नीला श्रीगोंदा येथे खाजगी दवाखान्यात नेले.

या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली असता पेट्रोलिंग करणारे पोलीस तातडीने घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी सदर वस्तीवर जाण्याचा रस्ता माहीत नसल्यामुळे श्रीगोंद्यात दरेकर कुटुंबिय उपचार घेत असलेल्या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्यासह अजून तीन लोकांना पोलीस गाडीत घेऊन घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. 

ही पोलिसगाडी हिरडगाव फाट्यानजीक गेली असता कोकणगाव परिसरात चोरटे दिसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून पोलिसगाडी त्या दिशेने गेली. हिरडगाव जंगलातून पुढे गेल्यावर कोकणगावला जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला पोलिसांना एका निर्जंन ठिकाणी एकटे घर दिसल्यामुळे त्यांना जागे करून सावध करण्यासाठी पोलीस त्या घराच्या दिशेने निघाले असता त्यांनी गाडीच्या उजेडात घराच्या मागच्या बाजूला एक जण डोकून पाहताना दिसला. 

त्यानंतर पोलीसाना काही समजण्याच्या आतच चौघे जण तेथून पळून जाताना दिसले. पोलिसांना संशय आला त्यामुळे पोकॉ संभाजी वाबळे व रवींद्र साठे तसेच त्यांच्यासोबत गेलेले प्रशांत दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पळून जाणाऱ्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरटे पसार झाले. त्यानंतर त्याठिकाणी राहणार्या संतोष शिंदे यांच्या घरी जाऊन पाहिले असता चिंचकुटवस्तीवर चोरी करून आलेल्या चार चोरट्यांनीच दगड व टॉमीने दरवाजा तोडून घरात प्रवेश करून संतोष शिंदे, त्यांच्या आई वडिलांना लोखंडी गजाने मारहाण केली. 

घरातील सर्व सामानाची ऊचकापाचक करून तुमच्याकडे असणारे पैसे द्या नाहीतर तुझ्या लहान मुलीला घेऊन जावू, तुझ्या आईला मारू असे म्हणत सर्व सामानाची ऊचकापाचक करून घरात असणाऱ्या ऐवजासह पळ काढला. संतोष शिंदे हे पुण्याला कामाला असून त्यांना कालच पगार व बोनस मिळाला होता. ती सर्व रक्कम घेऊन चोरटे निघून गेल्यामुळे या गरीब कुटुंबावर ऐन दिवाळीत संक्रांत कोसळली.

दरम्यान सदर घटनेबाबत हरिभाऊ भाऊसाहेब दरेकर यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पावणे दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. कोकणगाव शिवारातील शिंदे यांच्या घरातील सोन्या,चांदीचे दागिने,रोख रक्कम असे मिळून एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 

दोन्ही घटनांतील आरोपी एकच असल्याने चार अज्ञात चोरांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटना घडली तेव्हा श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे कर्जत याठिकाणी बंदोबस्त, पेट्रोलिंग कामी गेले होते. सदर घटनेबाबत समजताच काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अंधारात फिरून सर्वत्र परिसर पिंजून काढत चोरटयांचा शोध घेतला. 

सकाळी श्वानपथकाने कोकणगाव शिवारात माग काढला तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. ठसे तज्ञांनी घटनास्थळी जाऊन ठसे घेतले आहेत. पुढील तपास पो.नि बाजीराव पोवार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.