साई संस्थानच्या रुग्णालयात जन्मणाऱ्या मुलींना चांदीचे नाणे, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत.


दैनिक दिव्य मराठी :साईसमाधी शताब्दी वर्षात शिर्डीतील साई संस्थानच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबास २० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे देऊन शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, धनश्री सुजय विखे नगराध्यक्ष योगिता शेळके यांच्या हस्ते जन्माला आलेल्या मुलींच्या कुटुंबाला नाणे देऊन गौरवण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र कोते, अध्यक्ष तुषार शेळके, साई जोरी, योगेश गोरक्ष, दीपक वारूळे, विजय कोते, संतोष ढेमरे, सुदेश शिंदे, प्रमोद पवार, संजय भावसार आदी उपस्थित होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संतोष गोंदकर यांचा यावेळी अग्रवाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाआधी प्रतिष्ठानतर्फे श्रीसाईनाथ रुग्णालयात रुग्णांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. शिर्डीत नेहमीच विविध धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या शिलधी प्रतिष्ठानतर्फे ‘लेक वाचवा अभियान' राबवण्यात येत आहे. प्रतिष्ठानतर्फे साईरत्न पुरस्कार वितरण समारंभही दरवर्षी केला जातो.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष कोते म्हणाले, साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत. स्री जन्माचे स्वागत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करण्यात आले. घरात नवीन जन्माला येणारी मुलगी ही खऱ्या अर्थाने लक्ष्मीच असल्याचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात वर्षभरात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला एक चांदीचे नाणे देऊन बाळाच्या आईचा मुलीचा गौरव करण्यात येणार आहे. साई समाधी शताब्दी वर्षात साई संस्थानच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबास २० ग्रॅमचे चांदीचे नाणे देऊन शिलधी प्रतिष्ठानतर्फे स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.