महामार्ग नव्हे साक्षात मृत्युचा सापळा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-जामखेड महामार्गावरील अनेक पूल मोडकळीस आले असून ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. निंबोडी येथील ओढ्यावरील सुमारे 20 फुटांपर्यंत कठडे मोडकळीस आले आहेत. या पुलावर रात्री लहान-मोठे अपघात नेहमीच होत असतात.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सारोळाबद्दी येथील नदीवरील पुलाचे कठडे काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेने तुटले होते. मात्र, कठड्यांमुळे ट्रक नदीत जाण्यापासून वाचला होता. या घटनेला वर्ष उलटूनही बांधकाम विभागाने गांभीर्याने घेतले नाही. केवळ तुटलेल्या पुलाजवळ काही दगड मांडून त्यावर पांढरा रंग देऊन प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे सोडली आहे. पुलाजवळील क्षेत्र अपघातग्रस्त असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असतात. दशमीगव्हाण, चिचोंडी पाटील येथील पुलांचे कठडेही तुटल्याने नेहमीच अपघातांना आमंत्रण देत आहेत.

रस्त्यालगतची अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. या झाड्यांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने या फांद्या कधीही तुटून अपघात घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या मार्गावर एक ते दीड फुटांपर्यंत मोठमोठे खड्डे पडले असल्याने राजरोसपणे लहान-मोठे अपघात घडत आहेत. काही आठवड्यांपूर्वी खड्डे चुकवण्याच्या नादात एका दुचाकीवरून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर बांधकाम विभागाने या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करत हे खड्डे मुरुमाने बुजवले होते. मात्र, हे खड्डे कमी होण्याऐवजी वाढल्याने नागरिकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत आहे.

टोलनाका “असून अडचण नसून खोळंबा’
मार्गावरील टाकळी काझी येथे बंद अवस्थेत टोलनाका असून तो असून अडचण नसून खोळंबा बनला आहे. या टोलच्या कठड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत व काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.