‘सर्व धर्म समभावा’ला साईंच्या शिर्डीत तिलांजली? ‘भगवेकरणा’चे काम जोरात !

दैनिक दिव्य मराठी :- केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर साईबाबांच्या शिकवणीचा आत्मा असलेल्या ‘सर्व धर्म समभावाच्या’ तत्त्वाला तिलांजली देण्याचे काम सुरू झाल्याची जोरदार चर्चा शिर्डीत रंगली आहे. त्यामुळे भाविकांत अस्वस्थताही आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

‘सबका मालीक एक’अशी सर्व धर्म समभावाची किंबहुना सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण देणाऱ्या त्या नुसार हयातभर वर्तन करणाऱ्या साई बाबांचे जगभरात सर्व धर्मीय भक्त आहेत. अशा साईबाबांची शिर्डी गेल्या वर्षभरात बदलू लागली आहे. या ‘भगवेकरणा’चा प्रत्यय शिर्डीत साई बाबा संस्थानशी संबंध असलेल्या वास्तूंजवळ प्रकर्षाने येत आहे.

वर्षभरापूर्वी सुरेश हावरे यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांची निवड करण्यात आली. यातील बहुसंख्य विश्वस्त संघाच्या विचारधारेशी संबंधित असल्याची चर्चा तेव्हाही रंगली होती. आता ती खरी असल्याचा प्रत्यय येत आहे. मुळात संघ परिवार साई बाबांना किती मानतो, हा संशोधनाचा विषय आहे. कारण त्यांच्या शिकवणीचे ते ‘सर्व धर्म समभावा’चे तत्त्वच संघाला कितपत मान्य आहे, हा कळीचा मुद्दा आहे.

या विश्वस्त मंडळाने गेल्या वर्षभरात साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी एकही काम केले नाही. मात्र मंदिर परिसराचे भगवेकरण अतिशय वेगाने सुरू केले. मंदिर परिसर, साई बाबा रुग्णालय, भक्त निवास परिसरातील सर्व फलक भगवे झाले आहेत. 

साई समाधी शताब्दीनिमित्त मंदिर परिसरात ५० फुटांचा स्तंभ उभारण्यात येत आहे. त्यावर त्रिशूळ ओम लावण्यात आला आहे. त्यावर मोठा भगवा ध्वज लावून त्यावर साई समाधी शताब्दीचा लोगो असणार आहे. वास्तविक पाहता तेथे ‘सर्व धर्म समभावाचे प्रतीक’ लावण्यास हवे होते, असे भाविकांचे म्हणणे आहे.

तिरुपतीत केशदान, शिर्डीत रक्तदान, असा शिर्डीत उपक्रम सुरू करण्यात आला. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. पण जमा केलेले रक्त संघाशी निगडीत असलेल्या रक्तपेढ्यांत जात असल्याची माहिती बाहेर आल्याने त्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा उपक्रम साईबाबा संस्थानने सुरू केला. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. पण मदत देताना यवतमाळ जिल्ह्यातील संघाशी संबंधित असलेल्या संस्थेला मदत देण्यात आली. या सर्व घटनांमुळे शिर्डीत प्रचंड अस्वस्थता आहे. ही खदखद कधीही बाहेर येण्याची भीती एका राजकीय नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.