२० ऑक्टोबरला पुणतांब्यात शेतकरी मेळावा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी देशव्यापी लढा देण्यात येणार असून २० ऑक्टोबरला बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर पुणतांब्यात मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्षाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याने किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमात सांगितले.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

किसान क्रांतीच्या वतीने विजयादशमीनिमित्त रावणाचे दहन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर टाळून गावरान बियाणांचा वापर करावा, हे घोषवाक्य फलकावर लावण्यात आले होते. त्याप्रसंगी जाधव म्हणाले, १ जूनच्या संपामुळे राज्यात मोठी क्रांती झाली.

पुणतांब्याचे लोण राज्यात गेले. त्यामुळे राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. कर्जमाफीची प्रक्रिया चालू असून दिवाळीपर्यंत कर्जमाफीचा आकडा उपलब्ध होणार आहे. किसान क्रांतीचे शेतकरी संपाची हाक देऊन राज्यातील सर्व शेतकरी एकत्रित केले. 

शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार उदासिन असून त्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळून गावरान बियाणे वापरा याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शेतात राबवणारा खरा शेतकरी आज जागेवरच असून व्यापारी उद्योजक मालामाल झाले. 

मात्र, शेतकरी वर्गाच्या व्यथा लक्षात असून त्यासाठी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर २० ऑक्टोबरला पुणतांब्यात शेतकरी मेळावा होणार असून त्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

जाधव हे शेतकरी प्रश्नाबाबत देशव्यापी आंदोलन उभारण्याच्या तयारीत असून त्यास किती यश येणार हा येणारा काळच ठरवणार असून पुणतांबा परत एकदा संघर्षाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.