दसरा मेळाव्यावरून येणाऱ्या श्रीगोंद्यातील शिवसैनिकांच्या वाहनाला अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  दसरा मेळाव्यावरून परतत असताना रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील शिवसैनिकांच्या वाहनाचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते कामशेत दरम्यान विचित्र अपघात झाला. या अपघातात चालक (संजय रतन परदेशी, वय ४७ मूळगाव चिंभळे, ता.श्रीगोंदा हल्ली राहणार कुळधरण ता.कर्जत) यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत माहिती अशी की, दसऱ्या निमित्त शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी श्रीगोंदा तालुका शिवसेना प्रमुख संजय आनंदकर यांच्यासह रघुनाथ सपताळ, भाऊ पुराणे, नितीन रोहि, राहुल गायकवाड, वैभव चोर यांच्यासह आठ ते दहा शिवसैनिक मुंबईला गेले होते.

काल हा मेळाव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजन क्रुझर (गाडी क्रं एम.एच १२ एल डी ३७६०) मधून श्रीगोंद्याला परत येत होते. तेव्हा लोणावळा ते कामशेतच्या दरम्यान रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गाडीचे चालक संजय रतन परदेशी यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी गाडी थांबवली. गाडीतील बाकी शिवसैनिक झोपलेले होते. फक्त तालुकाप्रमुख संजय आनंदकर हे जागे होते. 

चालक परदेशी हे लघुशंका करून गाडीजवळ आले ते गाडीत बसण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडत असतानाचा मागून आलेल्या भरधाव ट्रकने (क्र.केए २५ डी ५०५५) चालक परदेशी यांना जोराची धडक दिली, त्यात परदेशी यांना जबर मार लागला.

त्यांना उपचारासाठी नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. सदरच्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, लोणावळा पोलिस ठाण्यात या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर अपघाताबाबत माहिती देताना शिवसेना नेते घनश्याम शेलार म्हणाले की, ट्रक चालक हा झोपेत होता. त्यामुळेच हा अपघात झाला. सदर घटनेबाबत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

रात्रीच्या वेळेस परदेशी यांना धडक दिलेला ट्रक आर्धा फूट अलीकडे गाडीत झोपलेल्या शिवसैनिकांच्या गाडीकडे आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला परंतु या अपघाताचे प्रत्यक्ष दरशी असलेले संजय आनंदकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक मात्र अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.