बारामतीच्या धर्तीवर श्रीरामपूरचा विकास साधावा : आदिक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहर विकासासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून घेऊन त्या शहरात राबविण्यासाठी बारामतीचा आदर्श घ्यावा. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी नियोजन करून एकदा बारामतीचा दौरा करावा. आपल्याला मार्गदर्शनसाठी बारामतीचे दरवाजे वाट पहात असल्याचे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी सांगितले. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

विजयादशमीनिमित्त येथील सिद्धीविनायक मंदिराच्या प्रांगणात श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित ग्रामसभेप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधा आदिक होत्या. यावेळी कल्याणमल चुडिवाल, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेविका समिना शेख, जयश्री शेळके, स्नेहल खोरे, नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, अल्तमेश पटेल, सुरेश बनकर, ॲड. विजय बनकर आदी उपस्थित होते.

आदिक म्हणाले, शहरात यापूर्वी काय झाले यात मला रस नाही. शहरातील रस्ते दुरुस्तीवर सध्या बरीच चर्चा आहे. भूमिगत गटार योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतरच रस्त्याचे काम करावी लागती. रस्ते झाले आणि गटार योजनेला काही अडचणी आल्यातर पुन्हा रस्त्याची कामे करावी लागतील, मग यासाठी खर्च कोणी करायचा असा प्रश्न उपस्थित करत यावरून पुन्हा राजकारण सुरू व्हायचे.

नगराध्यक्षांचा पिंड राजकारणाचा नसून त्यांना समाजकारणाची आवड आहे, असे सांगून शहराचा विकास करण्यासाठी आधी बारामतीला जावून यावे. तेथे शासनाच्या योजना कशा राबविल्या, कोणत्या योजनेतून निधी आणला कोणकोणती कामे झाली याची माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

कर्जमाफी योेजनेवर भाष्य करताना ते म्हणाले, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच शासनाने दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे जाहीर केले. तसेच ३४ हजार कोेटींची कर्जमाफी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची संख्याच ठरलेली नसताना हा आकडा आला कोठून हा संशोधनाचा विषय असल्याचे श्री. आदिक म्हणाले.

आ. कांबळे म्हणाले, रस्त्याचे व तहसील कार्यालयासंदर्भातील प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न राहील. जोपर्यंत रस्त्यावरील भूमिगत गटारींचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्यांची कामे करता येणार नाही. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी ग्रामसभेत येणारे विषयाची सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली.

शहरातील रस्ते, आठवडे बाजाराचा प्रश्न, सभेतील तक्रारींवर कारवाई होत नाही, दारिद्र्यरेषेचा सर्वे करावा, तहसीलदारांकडून अडवणूक होते, शहरातील फुटपाथ गायब झाले आहेत, शहरात सीसी टीव्ही बसवावे, यासह इतर विषयांवर नागेश सावंत, तुळशीराम गिरमे, रमेश कासार, पद्माकर शिंपी, रवी पाटील, मल्लू शिंदे, लकी सेठी, सरवरअली सय्यद, केतन खोरे, अरुण धर्माधिकारी, सचिन बडधे आदींनी सांगोपांग चर्चा केली. सूत्रसंचालन नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.