देवदैठणच्या मुलींची मैदानी स्पर्धेत बाजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील खेळाडूंनी पंढरपूर येथे झालेल्या पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करून मैदान गाजविले. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
देवदैठण येथील रहिवासी व सध्या विद्याधाम प्रशाला शिरूर येथे शिक्षण घेत असणारी शिल्पा अरुण गायकवाड (इयत्ता 11 वी) हिने १९ वर्ष वयोगटात तिहेरी उडी प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. तिची नागपूर येथे 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे . शिल्पाने सलग दुसर्‍या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली आहे.

तसेच विद्याधाम प्रशाला देवदैठण  येथे इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेली वैष्णवी मल्हारी वाघमारे हिने तिहेरी उडीत 17 वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळविला.या खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे, संजया नितनवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक धनाजी खरमाटे, मुख्याध्यापक संभाजी शेळके, संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा,शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांतजी बाफना, संस्थेचे सचिव तु. म. परदेशी, राजेंद्र भटेवरा यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.