सरपंच पदाच्या वादातून मारहाण ३ जखमी, १४ जणांवर गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरपंच पदाच्या वादातून जामखेड तालुक्यातील मोहरी येथे झालेल्या मारहाणीमध्ये तीनजण जखमी झाले. याप्रकरणी एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील मोहरी शिवारातील हातमोडे यांच्या वस्तीजवळ दि.१८ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्रिंबक नंदू गोपाळघरे, राहुल गोरख गोपाळघरे, बाळू दत्ता ठोंबरे,अप्पा बाबासाहेब बोडखे, रामदास शिवदास गोपाळघरे, तानाजी विष्णू गोपाळघरे, सागर हरिदास गोपाळघरे, मच्छिंद्र भानुदास गोपाळघरे, नवनाथ दादाराव गोपाळघरे, नंदू दादाराव गोपाळघरे, रामचंद्र नंदू गोपाळघरे, रोहित नवनाथ गोपाळघरे, हरिदास एकनाथ गोपाळघरे, विजय दत्ता बारगजे यांनी फिर्यादी भीवा श्रीपती बाबर (रा.मोहरी) यास तुझा नातेवाईक सरपंच युवराज हाळनोर हा सरपंच पदाची मुदत संपली तरी पदाचा राजीनामा का देत नाही? असे म्हणून फिर्यादी व त्याची पत्नी संगीता बाबर व सून सारिका बाबर यांना काठीने व लाथबुक्क्यांनीे मारहाण केली. 

तसेच भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेला लखन श्रीरामे यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेत तीनजण जखमी झाले असून,त्यांना उपचारासाठी गामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे. हे कॉ बडे. हे करत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.