राहुरीतील तरूण शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊ आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील बाबासाहेब कोंडाजी शेलार (वय ३८) या धरणग्रस्त तरूण शेतकऱ्याने नैराश्यामुळे दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बाबासाहेब शेलार हे बुधवारी सकाळी जनावरांसाठी चारा घेऊन येतो, असे सांगून रानात गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास काही महिलांना त्यांचा मृतदेह शिवारातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना पाचारण करून त्यांना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. शवविच्छेदनानंतर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत शेलार यांच्या कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेलार हे काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यांचे सुमारे दोन एकर कपाशीचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले होते. त्यांनी एका सहकारी बँकेकडून कर्जही घेतले होते. धरणग्रस्त असूनही त्यांना कुठेही नोकरी मिळाली नव्हती त्यामुळे नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.