मोटारसायकल शोरूमच्या सेल्समनला ३ लाखांना गंडविले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव शहरातील एका मोटरसायकल शोरूममध्ये काम करणारा सेल्समन मनोज गोरख पाठक (वय १९, रा. येसगाव) हा बुधवार दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शोरूमचा २ लाख ९० हजार रूपयांचा भरणा करण्यासाठी बँकेत गेला असता एका अनोळखी इसमाने सलगी करून हातोहात त्याला सुमारे तीन लाख रुपयांना गंडविल्याची तक्रार सेल्समन पाठक यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
फिर्यादीत पाठक यांनी सांगितले की, 'मेरा ज्वेलरी दुकान है, मुझे तुम्हारे मॅनेजर को पेमेंट करना है। तुम मेरे साथ बँक ऑफ बडोदा में चलो' असे म्हणून मला भरणा भरत असलेल्या बँकेतून बँक ऑफ बडोदामध्ये एका अनोळखी इसम घेवून गेला. नंतर त्या अनोळखी व्यक्तीने कोणाशी तरी फोनवर बोलून मला पैशाच्या थैलीसह बँकेतील खुर्चीवर बसवले. संबंधित अनोळखीच्या व्यक्तीने नंतर मला सांगितले की, बँकेबाहेर माझा माणूस उभा आहे. त्याच्याकडून पैसे घेवून या. तोपर्यंत तुमच्या जवळचे पैसे माझ्याजवळ ठेवा अशी बतावणी केली.

मी बाहेरच्या माणसाकडे पैसे घेण्यासाठी जाताच संबंधित अनोळखी व्यक्ती पैशाची बॅग घेवून पोबारा केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पाठक यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधत फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी करीत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.