मतभेद विसरुन गावच्या विकासासाठी एकत्र यावे - आ. थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील वाडयावस्त्यांवर व गावांमध्ये विकासाच्या विविध योजना आपण सातत्याने राबविल्या आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवर आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मैत्रीपुर्ण लढतींमुळे जय-पराजय हा होत असून सर्वांनी मतभेद विसरुन गावच्या विकासासाठी एकत्र यावे. सुसंस्कृत राजकारणाची तालुक्याची समृद्ध परंपरा असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रणजितसिंह देशमुख, अजय फटांगरे, अमित पंडित, नवनाथ अरगडे, ॲड.अशोक हजारे, नानासाहेब शिंदे, नानासाहेब गुंजाळ, दशरथ वर्पे, प्रभाकर कांदळकर, खराडीचे वसंत साबळे, खेमचंद निहलानी आदि उपस्थित होते. यावेळी कोळवाडे, खराडी, तळेगाव दिघे, वाघापूर येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

आ. थोरात म्हणाले कि, निवडणुका या लोकशाहीचा पाया आहेत. संगमनेर तालुक्यात एक कुटुंब एक परिवार म्हणून सगळे जण काम करत आहेत. या निवडणुकीत आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मैत्रीपुर्ण लढती झाल्या. देशात सध्या भाजपाचे सरकार असून ही संगमनेर तालुका मात्र कायम काँग्रेसच्या विचारांशी बांधील राहिला आहे. एक जूट व पक्ष संघटना, कार्यकर्त्यांची मोठी फळी ही आपली ताकद आहे. 

आपण सातत्याने तालुक्यात विकासकामे केली आहे. सहकारी संस्थांच्या उत्तम कारभारामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत झाली आहे. संगमनेर शहर हे सुरक्षित व सुसंस्कृत शैक्षणिक केंद्र म्हणून राज्यात नावारुपास आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी झाले गेले विसरुन गावच्या व तालुक्याच्या विकासात योगदान द्यावे. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा यापुढे ही सर्वांनी जपावी. मात्र तालुक्याच्या अस्मितेसाठी आपआपसातील मतभेद विसरुन एकत्र रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.