तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू... - खासदार दिलीप गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समर्थनगर येथील पाण्याची टाकी पूर्ण होऊन दहावर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. पाणी टाकी टोक्याजवळ असून देखील सारसनगर परिसरातील वसाहतींना टॅंकरवर अवलंबून रहावे लागते. या टॅंकरवर आतापर्यंत कोटी रुपयांची उधळण झाली आहे. ते थांबवा. सारसनगर टॅंकरमुक्त करा. समर्थनगरमधील टाकीतून पाणीपुरवठा न झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी दिला आहे. 
--------------------------------
ADVT -  दैनिक सकाळ चे निवासी संपादक डॉ.बाळ ज. बोठे यांची पुस्तके मिळावा आकर्षक डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर http://fkrt.it/AcbmyTuuuN अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा
--------------------------------------
भाजपच्या वकिल आघाडीचे अध्यक्ष राहुल रासकर यांनी या टाकीतून सारसनगरला पाणीपुरवठा व्हावा यासाठी गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबरला उपोषण केले होते. मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी या उपोषणाची दखल घेत त्यावर ताबडतोब उपाययोजना राबविण्याचे आश्­वासन दिले होते. मात्र काहीच कार्यवाही न झाल्याने खासदार दिलीप गांधी यांनी पुन्हा आयुक्तांशी चर्चा केली.

खासदार गांधी यांच्या संपर्क कार्यालयात या संदर्भात बैठक झाली. अभियंता विलास सोनटक्के यांना जाब विचारुन चांगले धारेवर धरले. आयुक्त मंगळे यांनी टाकीच्या कामाबाबत लेखी टिप्पणी दिली. मात्र या टिप्पणीत टाकीच्या कामापेक्षा फेज दोन योजनेबाबतची माहिती होती. आयुक्त मंगळे व अभियंता सोनटक्के यांनी नेहमीप्रमाणे दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने खासदार गांधी अधिकच संतापले, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
गांधी म्हणाले, 'सारसनगरमधील जनतेला महानगरपालिका निष्कारण वेठीस धरत आहे. उषाशी टाकी असतांना पाण्याकरीता टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. मनपाने संबंधित ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांची बिले अदा केलेली असतांना अद्याप या टाकीतून पाणीपुरवठा सुरु का होऊ शकला नाही.

महापालिकेतील अभियंत्यांचे व ठेकेदारांचे हितसंबंधी जुळलेले आहेत. त्यामुळेच अधिकारी ठेकेदारास पाठीशी घालत आहेत. इतके दिवस चालले आता खपवून घेणार नाही. सारसनगरमधील वसाहतींना जर तातडीने समर्थनगर टाकीतून पाणी पुरवठा झाला नाही, तर आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार मला आहे. ठेकेदाराने त्वरित काम सुरु न केल्यास त्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, असे देखील ते म्हणाले.

आयुक्त घनशाम मंगळे यांनी टाकीतून पाणीपुरवठा सुरु होण्यास विलंब का होत आहे, याची पूर्ण चौकशी ताबडतोब करणार आहे. सर्व अधिकाऱ्यांना ताबोडतोब यासाठी सूचना देणार आहे. तसेच टाकीचे पाइपलाइनचे अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला आदेश देणार आहे. 

या बैठकीनंतर सर्वांनी समर्थनगरमधील टाकीची पाहणी करुन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला, यावेळी ठेकेदार रसिक कोठारी यांना खासदार गांधी यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. गटनेता सुवेंद्र गांधी, ॲड.राहुल रासकर, अभियंता निंबाळकर आदी उपस्थित होते.

सारसनगरमधील टँकरने होणारा पाणीपुरवठा संबंधित ठेकेदाराने कुठलीही पूर्वसूचना न देता थांबविल्याने ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. ही ठेकेदाराची खेळी जनता विसरणार नाही. भारतीय जनता पक्षातर्फे या भागात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. दिलीप गांधी यांनी आयुक्तांना तातडीने मनपातर्फे टँकर सुरु करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ॲड. राहुल रासकर यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.