पोलिसाच्या घरी चोरी तरी खरी फिर्याद घेण्यास टाळाटाळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनतेच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन पोलीस म्हणून कर्तव्यावर आपली जबाबदारी नेवासा येथे रात्रपाळी करत गस्त घालून चोख पार पाडत असतानाच इकडे याच पोलिसाच्या कर्जत तालुक्यातील घरी जबरी चोरी होते मात्र त्याची कर्जत पोलीस आहे तशी साधी फिर्याद घेत नसल्याची गंभीर तक्रार या पोलिसाचे वडील घनश्याम जाधव यांनी करत जर हे पोलीस आपल्या बांधवालाच न्याय देत नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय असा संतप्त प्रश्न कर्जत पोलीसाबाबत उपस्थित केला आहे.
--------------------------------
ADVT -  दैनिक सकाळ चे निवासी संपादक डॉ.बाळ ज. बोठे यांची पुस्तके मिळावा आकर्षक डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर http://fkrt.it/AcbmyTuuuN अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा
--------------------------------------
 कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील मलठन रस्त्यावरील जाधव याचे घरी एन दिवाळीच्या काळात काल मध्यरात्री तीन वाजता जबरी चोरी झाली यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, कपडे व मोटारसायकल असा मोठा ऐवज चोरून नेला. 

याबाबत नेवासा येथे पोलीस म्हणून कार्यरत असलेले संग्राम जाधव याचे वडील घनश्याम जाधव यांनी आमचे प्रतिनिधी यांना सविस्तर माहिती दिली कि काल रात्र मी पत्नी जयश्री घनश्याम जाधव वय ५०, सून सोनाली संग्राम जाधव वय २५. व प्रणाली संग्राम जाधव वय एक वर्ष असे सर्व जन घरामध्ये झोपलो असताना मध्यरात्री ३ वाजणेच्या सुमारास चोरांनी दरवाजाला जोरदार मारून कोयंडा तोडून घरात प्रवेश केला,

घरामध्ये चार चोर आले होते तर दरवाज्यात दोन जन उभे होते. त्यांनी प्रथम आमच्या कडे असलेले चार मोबाईल घेऊन फोडून टाकले व महिलाच्या अंगावरील दागिने ओढू लागले असता मी एका चोराला पकडले मात्र इतरांनी कुर्हाडीचा धाक दाखवून सहकार्याला सोड नाही तर लहान मुलीचे तुकडे करू असा दम दिला यामुळे आपण त्याला सोडले त्यांनी घरातील सर्व कपाटाची उचकापाचक केली व घरातील सोन्याचांदीचे सर्व दागदागिने, रोख रक्कम, कपडे घेऊन पोबारा केला. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
जाताना बाहेर लावलेली माझी एमएच १६ एएक्स ६७५३ हि मोटारसायकल हि चोरून नेली. या चोराच्या हातात कुर्हाड, गज व लाकडी दांडके असे साहित्य होते. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी आम्ही करमाळा येथील युनियन बँकेच्या लॉकरमधून सोमवारीच सोने काढून आणले होते. 

त्यामुळे घरात जवळ जवळ बारा तेरा तोळे सोने, काही चांदीचे दागिने रोख पंधरा हजार रुपये, माझे नवीन कपडे व मोटारसायकल असा ऐवज चोरीस गेला असून चोरी करत असताना घरात लावलेला मुलाचा पोलीस वेशातील फोटो पाहून तुझा मुलगा पोलीस आहे ना तर तपास लाऊन दाखव असा दम देत आमचे काही बरे वाईट झाले तर आम्ही चार महिन्यांनी पुन्हा येऊ असा दम देऊन हे चोर पळून गेले. 

आज सकाळी आम्ही कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास गेलो असता कर्जत येथील पोलिसांना सर्व घटना सविस्तर सांगितली तो पर्यंत मुलगाही नेवासा येथून रात्रीची रात्रपाळी संपवून कर्जतला आला होता पोलिसांनी मी सांगितल्या प्रमाणे फिर्याद लिहून घेण्याऐवजी चारच चोराचा उल्लेख केला होता सदर बाब आमच्या लक्षात आल्यावर आम्ही पोलीस अधिकारी यांना याबाबत सांगितले असता तुम्ही सह्या करा आम्ही पुढे घेतो असे सांगून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र मी सहा चोर होते माझी त्याचे शी झटापट झाली असे सांगत असता कर्जतचे पोलीस मात्र फिर्यादीत स्वत:च्या सोईने बदल करून तसे माझ्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न करत होत्ते त्यामुळे आपण काहि सही केली नाही व आम्ही निघून आलो असे म्हटले. 

माझा मुलगा पोलीस आहे तो आपल्या कुटुंबियाला सोडून समाजाच्या रक्षणासाठी रात्रीपाली करत आपले कर्तव्य बजावत असताना त्याच्या कुटुंबीयावर पाठीमागे असा बाका प्रसंग ओढवला असताना त्यांना पाठींबा देण्याऐवजी कर्जतचे पोलीस अधिकारी आपल्यावर अन्याय करत असल्याची घणाघाती टीका घनश्याम जाधव यानी केली.

जर आपल्या पोलीस भावाला हे न्याय देत नसतील तर सर्वसामान्य नागरिकाला कशी वागणूक देत असतील असा संतप्त सवाल जाधव यानी केला आहे. याबाबत त्याचा मुलगा संग्राम जाधव यास प्रतिक्रिया विचारली असता त्याने मात्र आपण ज्या खात्यात काम करतो त्या खात्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. 

मात्र त्याची अगतिकता पाहवत नव्हती. या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनला विचारले असता निमगाव डाकू येथील घनशाम प्रयागा जाधव याचे घरात चार चोरांनी घुसून धाक दाखवत जबरी चोरी करून तीन लाख २६ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची माहिती दिली, घटनास्थळी फिंगरप्रिंट व डॉग स्कोडच्या पथकाने भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत भोये याचे मार्गदर्शनाखाली एपीआय एम पी इडेकर हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.