शिर्डी विमानतळावर असुविधांचा डोंगर; प्रवाशांना होतोय मनस्ताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नुकताच मोठा गवगवा करत कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन झाले; मात्र अजून साधे पैसे स्वीकारण्यासाठी स्वाईप मशीन येथे नाही. येथे असुविधा व समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
शिर्डीजवळील काकडी येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. येथून रोज मुंबईबरोबरच हैद्राबादला विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. 

त्याला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे. तिकीट बुक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे; मात्र काही प्रवासी थेट काकडी विमानतळावर जातात. त्यांना रोखीनेच पैसे देऊन विमानाचे तिकीट काढावे लागते. मात्र येथे स्वाईप मशिन नाही. परिणामी डेबीट व क्रेडीट कार्ड असुनही प्रवाशांना पुन्हा एटीएममधून पैसे काढण्यासाठी शिर्डीला यावे लागते.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
प्रवासी एअर इंडियाच्या टोल फ्री क्रमांकावर चैकशी करण्याकरीता दुरध्वनी करतात, तेंव्हा तेथे स्वाईप मशीन आहे, असे सांगण्यात येते; मात्र प्रत्यक्षात भ्रमनिरास होतो. याबाबत अधिक माहिती घेतली असता दोन राष्ट्रीयकृत बॅंकांच्या वतीने स्वाईप मशीन देण्याबाबत प्रस्ताव आले असल्याची माहिती मिळाली. मात्र ते अजून बसविण्यात आले नाहीत, याबाबतचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.