जिल्ह्यातील २६७ शेतकरी जाणार परदेशी दौऱ्यावर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा दौरा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच आहे.शेतकरी अभ्यास दौऱ्याचा शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. प्रत्येक शेतकऱ्याला परदेश दौऱ्यास जाण्याची इच्छा आहे. मात्र, मर्यादित लोकांचीच निवड करावयाची असल्याने सोडत पद्धतीने करण्यात आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले. 
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी परदेशी दौऱ्यासाठीची सोडत जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तंत्र अधिकारी अशोक संसारे, ता.कृ.अ. बाळासाहेब नितनवरे आदी उपस्थित होते.

श्री. महाजन पुढे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शासन स्तरावर प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला शेती विकास करावा, असे सांगितले. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
श्री. लोणारे म्हणाले की, या परदेश दौऱ्यासाठी २६७ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आलेल्या अर्जांपैकी ३३ अर्ज अपात्र ठरले आहेत. निवड झालेल्या २६७ शेतकऱ्यांची यादी विभागीय स्तरावर पाठवून देण्यात येणार आहे. 

इस्त्राईल, जर्मन, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठीा नेण्यात येणार आहे.शासनाच्या निकषानुसार लकी ड्रॉ केला आहे. जसा शासनाचा निधी उपलब्ध होईल, तसे शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

या परदेश दौऱ्यासाठी शासन ५०% मदत करणार असून, उर्वरित ५०% शेतकरी स्वत: भरणार आहेत, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक संसारे यांनी केले, तर आभार बाळासाहेब नितनवरे यांनी मानले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.