एसटी महामंडळाच्या कामगारांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी ही सुरुच.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कामगारांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी ही सुरुच राहिला. बस गाड्या डेपोतच ठप्प राहिल्याने खाजगी वाहतुकीच्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून धावत होत्या. दरम्यान मुंबईत एसटी कामगार व परिवहन सचिव यांच्यात वाटाघाटी सुरु असतानाच काल सकाळी अकोले आगारातील वाहक एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५१ ) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. 
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
मंगळवारी (ता. १७) एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन खात्याने जिल्हा प्रशासनास उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांच्या स्कूलबसे व इतर वाहने उपलब्ध करून देऊन नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश आज सर्व तहसिलदारांना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले.


 ११ आगारातून एकही बस गाडी रस्त्यावर धावली नाही. 
दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिल्यामुळे बस व्यवस्था ठप्प पडली होती. ११ आगारातून एकही बस गाडी रस्त्यावर धावली नाही. एका बाजूने मुंबईत एसटी कामगार संगठना पदाधिकारी व परिवहन मंत्रालयाचे सचिव यांच्यात बैठकांचे सत्र असताना दुसरीकडे कामगारांचा कडकडीत संप सुरूच राहिला. 

बसस्थानकालगत राज्य महामार्गांवर वाहतूकीची कोंडी 
जिल्हा प्रशासनाने अवजड व खासगी वाहतुकीला परवाने दिल्यामुळे येरव्ही प्रवासी वाहतूक करण्यास मज्जाव असणाऱ्या बस स्थानक परिसरात खाजगी वाहने उभी राहून प्रवासी गाडीत घेतले जात होते. त्यामुळे स्वस्तिक, माळीवाडा आणि तारकपुर या बसस्थानका लगत राज्य महामार्गांवर वाहतूकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र काल दिवसभर होते.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
स्कूलबसला प्रवासी वाहतुक परवानगीची तयारी 
बस स्थानकातून स्कूलबसला प्रवासी वाहतुक परवानगीची तयारी परिवहन खात्याने याची तात्काळ दखल घेत अधिसूचना काढली असून प्रत्येक तालुक्­याच्या ठिकाणी तात्काळ वाहन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. याबाबत जिल्हास्तरावर या संदर्भात दुपारी बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस प्रशासन विभागासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

                           
खाजगी वाहतूकदारांनी उठविला फायदा 
या संधीचा फायदा खाजगी वाहतूकदारांनी उठविला नसता तरंच नवल! नागरिकांना बाहेर गावी जाण्यासाठी अवाजवी रक्कममोजावी लागली असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या संपाची संधी साधून खाजगी वाहतूक दारांनी ऊखळ पांढरे करून घेतले. प्रावासासाठी जादा रक्क्म मोजावी लागल्यानंतर गडया, आपली एसटीच बरी, चांगली आहे, अशा प्रतिक्रिया नाडलेल्या प्रवाशांनी नोंदवल्या.

संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान वाहक एकनाथ विठ्ठल वाकचौरे (बॅच नं. २६) ह्या कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. यामुळे एस. टी. कर्मचारी संघटनांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने अकोल्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.