कॉंग्रेसच्या वतीने कर्जत तालुक्यात दोन तास रस्तारोको.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यात सुरु झालेल्या उडीद खरेदी केंद्रात हमी भावाने उडीद घेतला जात नाही. गावागावात विजेचे भारनियमन सुरु आहे. तालुक्यातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्याकडे लक्ष दिले जात नाही अशा विविध मागण्यावर आज कॉंग्रेसच्या वतीने नगर सोलापूर या राज्यमार्गावर माहिजळगाव येथे दोन तास रास्तारोको करण्यात आला. यावेळी अनेकांनी पालकमंत्र्यासह शासनावर कडाडून टीका केली. 
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
कर्जत तालुक्यात काही दिवसापूर्वी मोठा गाजावाजा करत उडीद खरेदीचे केंद्राचे उदघाटन पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे याचे हस्ते करण्यात आले. शासनाच्या नियमाप्रमाने शेतकर्यांनी पुन्हा एकदा रांगा लाऊन उडीद विक्री साठी अर्ज भरून दिले. मात्र अद्यापि एकाही शेतकर्याला उडीद खरेदी बाबत निरोप मिळालेला नसून तालुक्यात मंजूर केलेले केंद्र उडीद खरेदी करायला तयार नाही याशिवाय तालुक्यातील विविध प्रश्नावर आज कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत एन दिवाळीत नगर सोलापूर महामार्गावर रास्तारोको करून शेतकर्याप्रती आपण जागरूक असल्याचे दाखवून दिले. 

यावेळी तालुक्यातील पक्षाचे सर्वच नेते सहभागी झाले होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी शासनासह पालकमंत्री ना. शिंदे वर जोरदार तोफ डागत शासनाने उडीद हमी भावाने खरेदी करण्याचे मान्य करून केंद्र सुरु केले असताना उडीदा मध्ये मोशर जास्त आहे असे म्हणत नाकारला जात आहे. 

त्यामुळे एन दिवाळीच्या सणाच्या काळात नाईलाजास्तव शेतकर्यांना पैशासाठी अत्यंत कमी भावात उडीद विकावा लागत आहे. सदरचा उडीद हा शेतकर्यांनी भिजवलेला नसून तो नैसर्गिक आपत्तीने पावसाने भिजला असल्याचे म्हटले. तुकाईचारी मंजूर करणारे, माही जळगावला आरोग्य केंद्र उभा करणारे, पालकमंत्री विविध आश्वासने देतात मात्र ते पूर्ण करत नसल्याची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावेळी माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, दादा सोनमाळी, प्रवीण घुले, आदीसह अनेकांची भाषणे झाली तर कैलास शेवाळे यांनी पालकमंत्री ना. शिंदे वर घणाघाती टीका करताना काही वर्षापूर्वी पालकमंत्र्याचे वडील दारिद्ररेषे खालील यादीत होते असा कोणता चमत्कार झाला कि या दहा वर्षात ते तीन चार कोटीच्या बंगल्यात रहायला जात आहेत याचा सर्वांनी विचार करून नेमके अच्छे दिन कोणाला आले हे सर्व नागरिकांनी पहावे असे सांगताना तालुक्यातील रस्ते किती खराब झाले आहेत याचे कारण म्हणजे ठेकेदारांना ४० टक्के रक्कम कमिशन वर पदाधिकारी व अधिकारी यांना द्यावी लागत असून नंतर स्वत:साठी पैशे काढून उर्वरित रकमेत कामे करावी लागत आहेत त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ठ होत असून याची चौकशी होणे गरजेचे आहे. 

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु असून ते त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोन तास सुरु असलेल्या या रस्तारोको आंदोलनाकडे सर्व अधिकार्यांनी पाठ फिरवली त्यामुळे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांना आंदोलकांच्या रागाचा सामना करावा लागला मात्र तो अल्पवेळेपुरता ठरला यावेळी नायब तहसीलदार भोसेकर यांना निवेदन देण्यात आले. 

तर वीज वितरणचा स्थानिक कर्मचारी एम रंजन यानी १६ तारखेपासून भारनियमन बंद केल्याचे सांगितले, यावेळी कोणतेच वरिष्ठ अधिकारी न आल्यामुळे ते आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी मागणी शेतकरी करत होते. शेतकर्यामधून आपली दिवाळी साजरी होण्यासाठी आंदोलनातून काही तरी मार्ग निघेल या आशेपोटी दिवसभर आंदोलन करण्याची तयारी होती. मात्र ते शक्य झाले नाही. 

आगामी पाच दिवसात तालुक्यातील विविध प्रश्नावर प्रशासनाने मार्ग न काढल्यास दि २४ ऑक्टोबर रोजी विविध कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देऊन आदोलन स्थगित करण्यात आले. 

यावेळी रासपचे भानुदास हाकेमेजर, संजय तोरडमल, मिलिंद बागल, सतीश पाटील, पपू धुमाळ, किशोर कोपनर, विष्णुपंत खेडकर, नवनाथ कदम, बाळासाहेब शिंदे, सुभाष महारनवर, कांतीलाल देवगिरे, सुधीर फरतडे, मयूर डुकरे, भीमराव शिंदे, परशुराम डुकरे, अमित वाघमोरे, श्रीकांत कदम, किशोर कदम, आदीसह मोठ्या संखेने शेतकर्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. 

आंदोलनाचे सुत्रसंचलन गोकुळ इरकर यांनी केले. दोन तास चाललेल्या या रास्ता रोको मुळे पाच कि मी पर्यन्त वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. याच आंदोलनात इंग्रजी शाळेचा विद्र्यार्थी अमित वाघमोडे याने आपल्या मित्रासह फटाके न वाजता त्यावर खर्च न करता तो पैसा जमा करून शासनाकडे देण्यासाठी आणला होता मात्र तो स्वीकारण्यास नायब तहसीलदार यांनी नकार दिला.

यावेळी सर्वच नेत्यांनी शासनाचे वाभाडे काढत तुम्ही तर काही देत नाहीत मग या मुलांनी जमा केलेले पैसे घ्यायला काय हरकत आहे असा आग्रह धरला व हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविण्याची मागणी केली मात्र या आंदोलन प्रसंगी अशा पद्धतीने रोख स्वरूपाचे पैसे विद्यार्थ्याकडूनहि स्वीकारण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिला याबाबत बरेच वादंग झाले मात्र अधिकारी बधले नाहीत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.